पलटवार: देवेंद्र फडणवीस ‘मस्टर’मंत्री नव्हे ‘मास्टर’, त्यांच्याच मास्टरस्ट्रोकमुळे तुम्हाला घरी बसावे लागले; BJP ने ठाकरेंना डिवचले

मुंबई21 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मस्टरमंत्री म्हणून हेटाळणी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस ‘मस्टरमंत्री’ नसून मास्टर आहेत. त्यांच्याच ‘मास्टरस्ट्रोक’मुळे तुम्हाला घरी बसावे लागले, असे ते म्हणालेत.

Related News

उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष टिकवता आला नाही. आता ते भाजपमध्ये राम उरला नसल्याची टीका करता. पण त्यांनीच सत्तेसाठी हिंदुत्त्व गुंडाळून ठेवले. आता त्यांना प्रभू श्रीरामचंद्रांची आठवण येत आहे. राम मंदिराचे भूमीपूजन झाले तेव्हा जल्लोष करणाऱ्या रामभक्तांवर तुमच्या सरकारने राज्यभर गुन्हे दाखल केले होते, हे तुम्ही विसरलात की काय?, असे चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी एका ट्विटद्वारे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदेंचे बंड म्हणजे शिवसेनेला मुक्त करणे, असा टोलाही बावनकुळेंनी यावेळी ठाकरेंना हाणला. तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवली होती. ती प्रामाणिक शिवसैनिकांनी मुक्त केली. त्यानंतर आता बाळासाहेबांचा भगवा झेंडा पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अभिमानाने फडकत आहे, असे ते म्हणाले.

मोदींवर बोलण्याची लायकी नाही

यावेळी त्यांनी ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याची लायकी नसल्याचे नमूद करत देवेंद्र फडणवीस यांच्या मास्टरस्ट्रोकचीही आठवण करून दिली. उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची लायकी नाही. मोदींनी देशाचे नाव जगभर उंचावले. हे अनेकदा तुम्हीच सिद्ध केले आहे. ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना ‘मस्टर’मंत्री म्हणून हिणवले. पण फडणवीस मस्टरमंत्री नाहीत, तर ‘मास्टर’ आहेत. त्यांच्या ‘मास्टरस्ट्रो’कमुळेच तुम्हाला घरी बसावे लागले, असे बावनकुळे ठाकरेंवर पलटवार करताना म्हणाले.

औरंग्याचा उदो-उदो करत बसा

ठाकरेंनी भाजपमध्ये अफजलखान व औरंगजेबाची वृत्ती दिसून येत असल्याची जहरी टीका केली होती. यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, औरंग्याच्या प्रवृत्तीसोबत कोण बसले आहे, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले. औरंग्याच्या सत्तेला छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला, तसाच सुरूंग जनतेने तुमच्या सत्तेला लावला. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेना व भाजपला निवडून देईल. तोपर्यंत तुम्ही औरंग्या, अफझल खान व इंग्रजांचा उदो-उदो करत बसा.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *