‘देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण…’, काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी!

Prithviraj Chavan On devendra fadnavis : जालनामध्ये मराठा आरक्षणाच्या (Maratha  Reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गालगोट लागल्याचं पहायला मिळालं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला अन् राज्यभर खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता राज्यभरात याचे पडसाद उमटत असल्याचं दिसतंय. तर राजकीय वर्तुळात देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. मराठा आरक्षणबाबत सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पण आता तर हे शांततापूर्ण आंदोलन दडपण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. आंदोलन दडपण्याचे आदेश मुंबईतून दिल्याचं कळतंय, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी घटनेचा निषेध केला आहे.

मराठा आरक्षण देण्याबाबत भाजपने आतापर्यंत फक्त पोकळ घोषणा केल्या आहेत. केंद्रात व राज्यात भाजपचेच सरकार असताना मराठा समाजाला भाजपा सरकार का आरक्षण देऊ शकत नाही? हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. इतकी वर्षे प्रलंबित असणारा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा बांधवांच्याकडून शांततापुर्वक आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु असताना अशावेळी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांचे आंदोलनच दडपण्याचा क्रूर प्रकार सरकारकडून केला गेल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Related News

मराठा तरूणांवर आज झालेली लाठीचार्जची घटना निंदनीय असून या घटनेची तात्काळ न्यायालीन चौकशी झाली पाहिजे तसेच या निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

आणखी वाचा – जालना लाठीचार्जचे राज्यभर पडसाद, संभाजीराजे थेट गृहमंत्र्यांना इशारा, ‘खुलासा करा नाहीतर…’

दरम्यान, लाठीचार्जमध्ये कुणी जखमी होऊ नये यासाठी प्रयत्न केला गेला. लाठीचार्ज कमी झाला, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आला ते नसतं झालं तर पोलीस पथकाला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ज पोलिसांना घेरुन दगडफेक करण्यात आली. 12 पोलीस जखमी झाले. त्यानंतर तिथे लाठीचार्ज करण्यात आला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *