Dhanashree Verma: श्रेयस अय्यरनंतर आता मोहम्मद सिराज? धनश्री-सिराजचा ‘तो’ फोटो व्हायरल

Mohammad Siraj: युझवेंद्र चहलची ( Yuzvendra Chahal ) पत्नी अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत असते. धनश्री वर्मा ( Dhanashree Verma ) उत्तम डान्सर असून तिच्या डान्सचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर कधी टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरच्या ( Shreyas Iyer ) कथिक अफेअरवरून धनश्री चर्चेत असते. अशातच आता पुन्हा एकदा धनश्री चर्चेत आलीये. यावेळी धनश्रीचं ( Dhanashree Verma ) नाव आता टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबत जोडण्यात येतंय. 

टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीसह अनेक क्रिकेटपटू सुट्टीच्या काळात इंस्टाग्रामवर एक्टिव्ह असतात. नुकताच विंडीज दौऱ्यावरून मायदेशी परतलेला टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) ही इन्स्टाग्रामवर खूप एक्टिव्ह दिसून येतो. सिराज मैदानावरील गोलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. मात्र यावेळी तो त्याच्या गोलंदाजीमुळे प्रकाश झोतात आलेला नाहीये.

मोहम्मद सिराजसोबतचा धनश्रीचा तो फोटो व्हायरल

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा ( Dhanashree Verma ) मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबतचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. धनश्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. चहलसोबतचे तिचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता धनश्रीची ( Dhanashree Verma ) मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) सोबतची इन्स्टा स्टोरी व्हायरल झालीये. 

Related News

धनश्रीने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीये. ज्यामध्ये सिराज आणि धनश्री ( Dhanashree Verma ) गॉगल लावून एकाच पोजमध्ये एक फोटो काढताना दिसतायत. या स्टोरीमध्ये मोहम्मद सिराजला कोट करत धनश्रीने ‘सेम टू सेम’ असं लिहिलंय. याशिवाय सिराजने देखील ही शेअर केली आहे. 

दरम्यान आता हा फोटो सध्या व्हायरल होतोय. आता हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी धनश्रीचे नाव सिराज ( Mohammad Siraj ) सोबत जोडण्यास सुरुवात केलीये. इतकंच नव्हे तर दोघांनाही ट्रोल करायला सुरुवात केली. धनश्री वर्मा ( Dhanashree Verma ) अनेकदा श्रेयस अय्यरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत असते. मात्र त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं समोर आलंय.

मोहम्मद सिराज ( Mohammad Siraj ) ने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये चांगली कामगिरी केली. टेस्ट सिरीजनंतर वनडे आणि टी-20 सिरीजमधून सिराजला विश्रांती देण्यात आली. दरम्यान सिराज सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरतोय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *