एकनाथ खडसेंची मस्ती जिरली नाही का?: गिरीश महाजनांचे खडसेंना प्रत्युत्तर; म्हणाले- 10-10 मंत्रीपद घेताना तुम्हाला काही वाटलं नाही का?

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Girish Mahajan Attack On NCP MLA Eknath Khadse | Khadse Criticism Of The Shinde fadanvis Government Girish Mahajan Reply

मुंबई9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

राज्यात आता खोक्याचं राज्य सुरू झालेले आहे. पैसा, माज, मस्ती आली आहे. हा माज आणि मस्ती उतरवण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यसरकारवर केली. ते जळगावमध्ये आयोजित सभेत बोलत होते. त्यांच्या या घणाघाती टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

10 मंत्रीपद घेताना काही वाटलं नाही का
गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांची मस्ती अजून जिरली नाही का? आमची मस्ती काढत आहात. दहा दहा मंत्रीपद घेताना तुम्हाला काही वाटलं नाही का? तुमची मस्ती लोकांनी आणि सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पाहिली आहे. त्याची फळ तुम्ही भोगत आहात. आता उर बडवून काहीही उपयोग नाही.

दूध संघ, बॅंकेतून तुम्हाला लोकांनी हाकललं
गिरीश महाजन पुढे बोलताना म्हणाले की, 30-35 वर्षे तुम्ही भाजपात होता. सगळ्यात जास्त पदं तुम्ही भोगली आहेत. आता दोन वर्षात तुम्हाला आमची मस्ती दिसली का? तुमची मस्ती लोकांनी उतरवली आहे. तुमचा विधानसभेत पराभव केला, दूध संघ आणि बँकेतून तुम्हाला हाकललं, तुमचं काय राहिलं आहे. आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत, असे महाजन म्हणाले.

हे ही वाचा

‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलने खडसेंची टोलेबाजी:म्हणाले- फडणवीस एक नंबर खोटारडा माणूस; अजित दादा तुमचा स्वाभीमान कुठेय?

ओबीसींना आरक्षण दिले नाही तर मी राजकारण सोडून देईल, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, असा घोषणा करणारा भाजप नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. पण प्रत्यक्षात असे झालेच नाही. हा माणूस खोटारडा आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. ते जळगावात सभेला संबोधित करत होते. भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी खडसेंनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ ही स्टाईल वापरून फडणवीसांचे जुने व्हिडिओ दाखवून जोरदार टोलेबाजी केली. – येथे वाचा संपूर्ण बातमी

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *