नागपूर9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंवाद पदयात्रेला रविवारी सुरुवात झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथे शहीदांना नमन करून जनसंवाद पद यात्रेला सुरुवात केली. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची नागपुरात जनसंवाद यात्रा काढली. या दोन्ही यात्रेत सहभागी होण्याऐवजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या मतदारसंघात लोकसंवाद यात्रेला सुरूवात केली. यात्रा ब्लॉक क्रमांक 13 येथील प्रभाग क्रमांक 1 मधील नारा वस्तीपासून सुरू होऊन जिंजर मॉल जरीपटका परिसर येथे समाप्त झाली. पदयात्रेत नितीन राऊत यांनी उत्तर नागपूरमध्ये केलेल्या विकास कामांबद्दल जनतेशी थेट संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
पदयात्रा नारा येथून सुरू होऊन उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात फिरली. १२ सप्टेंबर रोजी लोकसंवाद यात्रेची सांगता होणार आहे. लोकसंवाद कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जनसभेचे आयोजन असे या पदयात्रेचे स्वरूप आहे. या पदयात्रेत युवक कांग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश कांग्रेस कमेटीचे महासचिव संजय दुबे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अजित सिंह, शहर कांग्रेस उपाध्यक्ष बंडोपंत टेंभूर्णे, हरिभाऊ किरपाने, ठाकुर जग्यासी, माजी नगरसेवक व प्रभाग अध्यक्ष सुरेश जग्यासी, माजी नगरसेवक व प्रभाग अध्यक्ष महेंद्र बोरकर, माजी नगरसेवक दिनेश यादव, माजी नगरसेविका नेहा राकेश निकोसे यांच्यासह महिला काँग्रेस, एन. एस. यु. आय, युवक काँग्रेस व सर्व काँग्रेस फ्रंटल संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.