चर्चा: शोएब मलिकने इन्स्टाग्राम बायोमधून काढले सानियाचे नाव, घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण

  • Marathi News
  • Sports
  • Shoaib Malik Removes Sania’s Name From Instagram Bio, Sparking Divorce Talks Once Again

क्रीडा डेस्क6 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारताची माजी टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये बदल केला आहे. शोएबने बायोमधून सानिया मिर्झाचे नाव काढून टाकले.

Related News

शोएबने यापूर्वी बायोमध्ये सानिया मिर्झाचा उल्लेख ‘हजबंड टू अ सुपरवुमन’ असा केला होता. त्याने आता ती ओळ बायोमधून काढून टाकली आहे. त्यामुळे हे दोघे लवकरच एकमेकांपासून विभक्त होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नोव्हेंबरमध्येही आली होती घटस्फोटाची बातमी
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सानियाचा शोएब मलिकपासून घटस्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, दोघांकडून यावर काहीही बोलले गेले नाही. त्यानंतर सानियाने शोएब मलिकसोबतचा एक फोटोही शेअर केला. दोघांनी ‘मलिक-मिर्झा शो’ हा टॉक शोही सुरू केला होता. अशा परिस्थितीत त्यांच्या घटस्फोटाची बातमी खोटी असल्याचे म्हटले गेले.

पाकिस्तानी मीडियाने सांगितले होते कारण
आतापर्यंत सानिया किंवा शोएब दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही लिहिलेले नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानी मीडियाने दोघे वेगळे राहत असल्याचा दावा केला होता. ते मुलगा एकत्र वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले होते. मात्र त्याबद्दल अधिक काही लिहिले गेले नाही.

5 महिने डेटिंगनंतर लग्न, 10 वर्षांनी झाला मुलगा

  • सानिया-शोएबची पहिली भेट भारतात 2004-2005 मध्ये झाली होती. दोघेही फारसे बोलत नव्हते. 2009-2010 मध्ये ऑस्ट्रेलियन शहरात होबार्टमध्ये दोघे पुन्हा एकमेकांना भेटले.
  • सानिया टेनिस खेळायला आली होती आणि शोएब त्याच्या टीमसोबत क्रिकेट खेळायला आला होता. यावेळी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. इथे ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मग भेटीची मालिका सुरू झाली.
  • जवळपास 5 महिने एकमेकांना ओळखल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाचे सर्व विधी हैदराबादमध्ये पार पडले. यानंतर लाहोरमध्ये रिसेप्शन पार पडले. लग्नाच्या 10 वर्षांनी त्यांचा मुलगा इझानचा जन्म झाला.
  • सानियाने तिच्या ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ या आत्मचरित्रात लिहिले आहे की, शोएब अशा वेळी तिच्या आयुष्यात आला जेव्हा तिला तिच्या व्यावसायिक जीवनात अडचणी येत होत्या.
  • सानिया आणि शोएबचे लग्न 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये झाले होते. 15 एप्रिल रोजी लाहोरमध्ये रिसेप्शन देण्यात आले होते. दोघांना एक मुलगा इझान आहे. त्याचा जन्म 2018 मध्ये झाला होता.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *