जिल्हाधिकाऱ्यांचे अधिसुचना जारी करण्याचे आदेश: जिल्ह्यात 20 मंडळात 321 गावांना मिळणार पंतप्रधान पीक विमा योजनेची 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • 321 Villages In 20 Mandals In The District Will Get 25 Percent Advance Compensation Of Prime Minister’s Crop Insurance Scheme, District Collector Orders To Issue Notification

छत्रपती संभाजीनगर8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप हंगामाची स्थिती बिकट झाली आहे. मात्र 20 महसूल मंडळात सलग 21 किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचा खंड पडला आहे.त्यामुळे या भागातील पिकांच्या उत्पादनात 50 टक्के घट येणार आहे. त्यानुसार पीक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता याबाबीखाली शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याची अधिसूचना जारी करावी असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत.त्यामुळे 321 गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक आज घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, विमा कंपनी, स्कायमेट प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

सरासरीच्य केवळ ६४ टक्केच पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र 6 लाख 84 हजार 716 हेक्टर इतके असून त्यापैकी 6 लाख 58 हजार 123 हेक्टर पेरणी झाली आहे. ऑगस्ट 2023 अखेर 431 मिमी पर्जन्यमान अपेक्षित असतांना प्रत्यक्षात केवळ 276 मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षीत सरासरीच्या 64.14 टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळात 16 ते 40 दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. परिणामी खरिप पिकांची अवस्था बिकट आहे

21 दिवसाचा खंड पडल्यानंतर मिळते अग्रिम रक्कम

याबाबत जिल्हा कृषी अधिक्षक प्रकाश देशमुख यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले की पेरणीपासून एक महिना झाल्यानंतर सलग 21 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांचा कालावधी पावसाचा खंड असल्यास ही 25 टक्के अग्रीम रक्कम दिली जाते. जिल्ह्यात 20 महसूल मंडळे यासाठी पात्र ठरली आहेत.यामध्येऔरंगाबाद तालुक्यातील 4, फुलंब्री तालुका 1, वैजापुर तालुका 10 व गंगापूर तालुक्यातील 5 महसूल मंडळे आहेत.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *