दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह: ​​​​​​​सत्तेतील लोक आम्हाला येऊन सांगतायत आमचे कार्यालय फोडा; जरांगे पाटील यांचा गौप्यस्फोट

बीड/ जालना/ मुंबई20 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

माजलगाव | ‘आडमुठी भूमिका घेऊन चालणार नाही. पोरखेळ झालाय नुसता. सरकारला मुदत देणारा महाहुशार माणूस. कधी ग्रा.पं. निवडणूक लढवली का?…’ मनोज जरांगे पाटलांविषयी असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने आ. प्रकाश सोळंके यांचा बंगला मराठा आंदोलकांनी सोमवारी सकाळी पेटवला.

  • ज्यांच्याकडे पुरावे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकार तयार; पण निर्णय जरांगेंना अमान्य
  • निर्णय न झाल्याने संयम सुटला; आ. क्षीरसागरांचा बंगलाही पेटवला
  • जरांगेंविषयी वादग्रस्त वक्तव्य; माजलगावात आ. सोळंकेंचे घर जाळले
  • खासदार, दोन आमदारांचे राजीनामेबीडला इंटरनेट बंद, धाराशिवला कर्फ्यू​​​​​​
  • ​आ. प्रशांत बंब यांचे अॉफिसही फोडले
  • संभाजीनगरमध्ये आज सिटी बस बंदजरांगे पाटलांकडून शांततेचे आवाहन

Related News

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागले. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके व बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंगले आंदोलकांनी जाळले. इतर राजकीय पक्षांची कार्यालयेही पेटवली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. धाराशिव जिल्ह्यातही संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. दरम्यान, उपोषणाच्या सहाव्या दिवशी जरांगेंची प्रकृती बिघडली होती. उभे राहताच ते स्टेजवर कोसळले. तरीही ते प्रतिक्रिया देत होते. ‘शांततेत आंदोलने करा. उद्या कुठे जाळपोळ झाल्याचे कळाले तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल,’ असा इशाराही त्यांनी आंदोलकांना दिला.

कुठे काय घडले? 2 राजीनामे : गेवराईचे भाजप आ. लक्ष्मण पवार,

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *