दिव्य मराठी अपडेट्स: एकनाथ शिंदे यांनी बोलावली समर्थक आमदारांची महत्त्वाची बैठक; आमदार अपात्रता प्रकरणामुळे बैठकीकडे लक्ष

मुंबई18 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर…

Related News

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शिंदे गटाच्या मंत्री, आमदार, खासदारांची या ‌बैठकीला उपस्थिती असेल. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. आज न्यायालयात आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवरती शिंदे गटाच्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
  • मुख्यमंत्र्यांचा यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम असून त्यानंतर ते जालनाकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बाबतची कोणतीच अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने तसेच राज्यभरात मराठा समाजा आक्रमक होत असल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्ह्याचा दौरा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर (सिनेट) निवडणुकांचे संभाव्य वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. विद्यापिठाने यासंबंधीची अधिसूचना देखील जाहीर केली आहे. 21 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार असून आणि 24 एप्रिल 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच यासाठी नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू होणार असल्याचेही या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. या संबंधीत आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार अखेर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मराठा आरक्षणासंबंधी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यातच राज्यभरातून मराठा समाजाचा विरोधही अधिकही तीव्र होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
  • यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मराठा समाजाने विरोध दर्शवला आहे. यवतमाळ शहरात या कार्यक्रमाचे लागलेले पोस्टर मराठा आंदोलकांनी फाडले आहेत. राज्यभरात मराठा समाजाने नेत्यांना गावबंदी केलेली असल्याने आता त्याचा फटका शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला देखील बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  • शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजारपणामुळे आधीच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
  • मराठावाड्यातील सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचे आंदोलन अधिक तीव्र होत आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मराठवाड्यात सर्व आमदार हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्त्वात हे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *