मुंबई27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर…
Related News
- मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्र खालोखाल तरी ऊस दर मिळावा करिता आज सकाळी 11 वा. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथील पांगरीकर कॉम्प्लेक्स येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. शेतकरी चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यातील ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य तथा शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे.
- पुणे येथील ससून रुग्णालयातून फरार झालेला कैदी ललित पाटील याला अटक करण्यात आल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. आता ललित पाटील याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. पुणे पोलिसांनी यासंदर्भात गोपणीय अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
- कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना मराठा समाज आणि कोळी समाजाचा विरोध होत आहे. मात्र, आता हा विरोध मावळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पंढरपूर येथील कार्तिक एकादशीच्या महापूजेचा पेच देखील सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा कार्तिकीच्या महापूजेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान देण्याचा निर्णय होऊ शकतो. यासाठी जिल्हाधिकारी आणि महाराठा समाज यांच्यात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा निर्णय होऊ शकतो.
- धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची (एसटी) अंमलबजावणी करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी समस्त धनगर समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता शहरातील गांधी चमन येथून या मोर्चाला प्रारंभ होईल. यात लाखोंच्या संख्येने धनगर बांधव सहभागी होतील, असा दावा संयोजकांनी केला आहे.
- मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भल्या पहाटेच मुंबई शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे पाच वाजताच रस्त्यावर उतरले होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद देखील साधला. तसेच नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल ऑन द स्पॉट घेत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
- सध्या चायनीज मांजावर बंदी असतानाही शहरात सर्रास त्याची विक्री होत आहे. हा मांजा मात्र दुचाकी चालकांच्या जीवावर बेतत आहेत. रविवारी दुपारी यवतमाळमध्ये नागपूर रोड ते बँक चौक रस्त्यावर एका मांज्यामुळे 5 वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरला गेला. जैन रफिक मवाल असे या चिमुकल्याचे नाव आहे. दुचाकी चालकांच्या सावधानतेने गाडीला ब्रेक दाबल्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, गळ्यावर मात्र चिर पडली असून गंभीर दुखापत झाली आहे.
- पीक विम्याचे पैसे दिले नसल्याने जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 156 फळबाग शेतकरी संकटात सापडले असून, त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. याला कृषी विभाग आणि पीक विमा कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करत अमरावतीमधील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. या वेळी कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात शेतकऱ्यांनी स्वतःसह अधिकारी व पीक विमा कंपनी प्रतिनिधींना तब्बल दीड तास कोंडून ठेवले. पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतली. या आंदोलनाची तीव्रता बघता पोलिसांना बोलावले. यादरम्यान विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी यांच्यासह दीड ते दोन तास चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. तत्पूर्वी तत्काळ मागणी पूर्ण न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोकविकास संघटनेच्या वतीने कृषी विभागासह पीक विमा कंपनीला देण्यात आला.