मुंबई10 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर…
Related News
- ससून रुग्णालयात दाखल आरोपी ललित पाटील याच्यावर उपचाराच्या नावाखाली महिनोंनमहिने त्याची बडदास्त ठेवण्यात आली होती. तो फरार झाल्यानंतर यासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने ससून रुग्णालयासंदर्भात चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या चौकशी समितीचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशी करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती मुदत आता संपली असून त्यानंतर हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. या अहवालात नेमके काय आहे, त्यासंदर्भात गोपनीयता पाळण्यात येत आहे. मात्र, यात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून ते अन्नपाण्याशिवाय तीव्र उपोषण करत आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती थोडीशी खालावल्याची माहिती आहे. असे असले तरी डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यास जरांगेंनी नकार दिला आहे. आता माझ्यावर मराठा आरक्षण हेच उपचार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
- दिल्लीतील महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्यासह सहा जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक याच प्रकरणी भुजबळ बंधूंनी कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या दोघांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे भुजबळ बंधुंच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भुजबळ यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पक्षात मोठे पद दिलेले आहे.
- शिवसेनेच्या आमदार अपात्र दिरंगाई प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तयार केलेल्या वेळापत्रकाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यानंतर अध्यक्षांना आज पुन्हा सुनावणीबाबत सविस्तर माहिती देऊन सुधारित वेळापत्रक न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्याशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक दोन दिवसांपूर्वी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आता नवीन वेळापत्रकाबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील बरॅकमध्येच जुगाराचा डाव मांडला. हा प्रकार परभणी येथे उघडकीस आला. पोलिस अधीक्षक रागसुधा आर. यांनी स्वत: कारवाई करत 7 जुगारी पोलिसांना पकडले. त्यात परभणीतील 5, महामार्गावरील एक व लाचलुचपत विभागाच्या एका पोलिसाचा समावेश आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात 7 जुगारी पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, 5 पोलिसांना निलंबित केले.