मुंबई31 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर…
Related News
- दौंड शुगर या साखर कारखान्यात अजित पवार यांच्या हस्ते गळित हंगामाचा शुभारंभ झाल्यास त्याला विरोध होण्यासह मराठा समाजाच्या वतीने अजित पवार यांचा निषेध होण्याची शक्यता आहे. तसेच निवेदनही देण्यता आले आहे. सदर कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते न करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता या गळित हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या ऐवजी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
- आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार राहुल नार्वेकर यांना लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावीला वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत दोन्ही पक्षाकडून पुरावे सादर केले जाऊ शकतात. या सुनावणीकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
- छत्रपती संभाजीनगरमधील ग्रामीण भागात पुढील 48 तास इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजमाध्यामावरून अफवा थांबव्यात यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
- बीड शहरात मराठा समाज, व्यापारी संघ व पोलिसांतर्फे आज सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शांतता रॅली निघेल. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे व पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत काल एक बैठक झाली. त्यात समन्वय समिती स्थापन्याचा निर्णय झाला. त्यानुसार सायंकाळी 6 वाजता शांतता समितीची बैठक रवीराज मंगल कार्यालयात होणार आहे.
- लातूर शहरात मराठा आरक्षणासाठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या उपोषणाच्या स्टेजवरून लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे माजी आमदार वैजनाथ शिंदे यांना संतप्त आंदोलकांनी खाली उतरवल्याची घटना घडली. माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी देखील उपोषण स्थळावरून काढता पाय घेतला. दरम्यान, लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत.
- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक विद्यार्थ्यांना गुरुवारपासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केले जाईल. त्यानुसार बारावीची बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्चदरम्यान, तर दहावीची 1 ते 26 मार्च 2024 दरम्यान होईल. www.mahasscboard.in या संकेतस्थळावर वेळापत्रक पाहता येईल, अशी माहिती शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. ‘परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाच्या संकेतस्थळावर गुरुवारपासून उपलब्ध होईल. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 10 ते 29 फेब्रुवारीदरम्यान घेतली जाईल. बारावीची परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारीदरम्यान होईल.
- चाकण येथील ड्रग्ज प्रकरणात अटक करून 3 वर्षे झाली आहेत. अजूनही त्या प्रकरणात जामीन मिळाला नाही. आता ससून रुग्णालयातील प्रकरणात गुन्हा दाखल होईल आणि जन्मभर जेलमध्येच सडावे लागले, या भीतीने ललित पाटील ससून रुग्णालयातून पळाला होता. दरम्यान, तीन वर्षांपासून एकाच गुन्ह्यात जामीन मिळाला नाही. आता तर दुसरा दाखल झाला आहे याच भीतीने पळालो अशी माहिती ललित पाटीलने चौकशी दरम्यान दिल्याचे सूत्रांनी सांगितले. ससून रुग्णालयाच्या गेटवरच दोन कोटींच्या मेफेड्रोन या अमली पदार्थांसह ललित पाटीलच्या 2 साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने 1 ऑक्टोबर रोजी अटक केली. यानंतर 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. 17 दिवसांनी मुंबई पोलिसांनी त्याला बंगळुरू येथून अटक केली होती.