विराटशी पंगा… नको रे बाबा! शाबादने घेतली किंग कोहलीची धास्ती; म्हणतो ‘जिंकायचं असेल तर…’

Shadab Khan On Virat Kohli : नेपाळचा दारूण पराभव केल्यानंतर आता पाकिस्तानसमोर तगड्या टीम इंडियाचं (IND v PAK) आव्हान असणार आहे. पाकिस्तान संघाने नेपाळचा तब्बल 238 धावांनी पराभव केला. या सामन्यात बाबर आझम, इफ्तिकार अहमद आणि शाबाद खान (Shadab Khan) यांनी दम दाखवला. बाबर आणि इफ्तिकारने शतक ठोकलंय. तर शाबादने 4 विकेट घेत नेपाळला करेक्ट कार्यक्रम केला. आता टीम इंडियासमोर (Indian Cricket Team) पाकिस्तानचा टिकाव लागेल का? असा सवाल विचारला जातोय. अशातच सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाची तारांबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. त्याला कारण विराट कोहली (Virat Kohli).. किंग कोहलीच्या बॅटिंगची पाकिस्तानने धास्ती घेतल्याचं पहायला मिळत आहे.

पाकिस्तानचा स्टार ऑलराऊंडर शाबाद खान याने नेपाळविरुद्ध 4 विकेट घेतल्या. मात्र, आता शाबादने स्वत:च्या टीमला सल्ला दिला आहे. विराटपासून सावध रहा, असा सल्ला शाबाद खानने बाबर अँड कंपनीला (Pakistan Team) दिला आहे. 

नेमकं काय म्हणाला शाबाद खान?

कोणत्याही संघाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत सामना पलटवण्याची ताकद विराट कोहलीमध्ये आहे. मागील टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासोबत जेव्हा पाकिस्तानचा सामना झाला, तेव्हा विराट ज्याप्रकारे सामना फिरवला, तो क्षण अविश्विनिय होता. जगातील असा कोणताही फलंदाज असं करू शकेल, असं मला वाटत नव्हतं. आमच्याकडे तगडी बॉलिंग लाईनअप होती. ज्याप्रकारने सामना आमच्या हातात होता, मात्र विराटने तो सामना पलटवला, त्यामुळे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असं शाबाद खान म्हणतो. त्यावेळी त्याने पाकिस्तानच्या संघाला सावध राहण्याचा सल्ला देखील दिला.

Related News

विराट कोहली जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला आऊट करायचं असेल तर तुम्हाला खूप प्लॅनिंग करावं लागेल. त्यामुळे विराटच नाही तर टीम इंडियाविरुद्ध तुम्हाला डोक्याने खेळावं लागेल. पाकिस्तान संघाकडे दर्जा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याचं कौशल्य आहे. त्यामुळे सामन्यातील परिस्थिती कशी असेल. त्यावरून तुम्हाला गोलंदाज आणि फलंदाजांच्या मनातील गोष्टी हेरून माईंड गेम खेळावा लागेल, असं शाबाद खान म्हणतो.

आणखी वाचा – IND vs PAK सामन्यात सूर्यकुमारला संधी नाही? ‘या’ खेळाडूची जागा पक्की! कॅप्टन रोहितचा मास्टरस्ट्रोक

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान सामन्यात महत्त्वाचा ठरेल, तो विराट विरुद्ध हॅरिस रॉफ यांच्यातील कडवी टक्कर… कोहलीने हॅरिसला दोन खणखणीत सिक्स खेचत विराटने पाकिस्तानला पाणी पाजलं होतं. ‘कोहली गोज डाऊन द ग्राऊंड… कोहली गोज आऊट ऑफ द ग्राऊंड’, हर्षा भोगले यांचे हे शब्द पाकिस्तानला आजही टोचत असतील. त्यामुळे पाकिस्तान विराटविरुद्ध फुल टु प्लॅनिंगने उतरेल, यात काही शंका नाही. मात्र, बाप बाप होता है… म्हणत नेटकऱ्यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहेत. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *