Drugs Case : ललित पाटीलच्या फॅक्टरीतील बहुतांश ड्रग्ज मुंबईला | महातंत्र








पुणे : महातंत्र वृत्तसेवा : नाशिकमधील कारखान्यात तयार झालेला सर्व मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज मुंबईत विक्री झाल्याची माहिती ललितने दिली आहे. त्यातील पुण्यातील ससून रुग्णालयाजवळील पहिलीच डील फसली अन् ललितचा राज्यासह इतरत्र चालणार्‍या ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिकमध्ये ललितच्या टोळीने 9 ते 10 महिने हा कारखाना चालविला होता. त्यात महिन्याला 200 किलो ड्रग्जचे उत्पादन करण्यात येत होते. त्यातील मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा पुरवठा होत होता. त्यामुळे आता मुंबईत ड्रग्जचे जाळे किती घट्ट आहे, हेही पुन्हा दिसून आले आहे.

पुणे पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली. त्याला न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस त्याच्याकडे आता कसून तपास करत आहेत. त्यातून एक एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. नाशिकमध्ये कारखाना सुरू केला. या कारखान्यात ललित गँग महिन्याला 200 किलोच्या जवळपास ड्रग्जचे उत्पादन करत होते. दरम्यान, भूषण व अभिषेक हे ड्रग्ज पुरवत होते. ललित डील करत होता.

मुंबईमधील इम—ान ऊर्फ अमीर शेख हा ललित गँगकडून हे ड्रग्ज मुंबईत नेत होता. इम—ान हे ड्रग्ज त्याच्या खालील 6 डीलरला विक्री करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ललित गँगने आतापर्यंत उत्पादन केलेले सर्व ड्रग्जचा साठा हा मुंबईत विकला गेला आहे. पुण्यात ड्रग्जची पहिलीच डील ललितने रुग्णालयातून केली. पण ती फसली आणि पोलिसांनी ती पकडली. या डीलला भूषणचा विरोध होता. तरीही ललितने ती केली, असेही आता समोर आले आहे.

तीन किलो सोने जप्त

ललित पाटील याने पळून गेल्यानंतर त्याने काही किलो सोने खरेदी केले होते. त्यातील 3 किलो सोने पोलिसांनी जप्त केले. पण, ललितकडे आणखी सोने असल्याची शक्यता पाहता पोलिसांनी त्यादृष्टीनेदेखील तपास सुरू केला आहे. सोने जप्त करण्यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे.

लोहरे ड्रग्ज तस्करीतील गुरू!

ड्रग्ज बनविण्याचा मास्टर अरविंदकुमार लोहरे असल्याचीही माहिती उघड झाली असून, कुख्यात ललित पाटील हा लोहरेला या व्यवसायातील गुरू संबोधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन उत्पादन करण्याचा फॉर्म्युला होता.
लोहरे हा महाड, रांजणगाव गुन्ह्यातदेखील आरोपी आहे. त्यानंतर आता पुण्यातील गुन्ह्यातही तोच या सर्वांना ड्रग्ज बनविण्याचा फॉर्म्युला दिल्याचे समोर आले आहे. या व्यवसायात लोहरे इतके डोके कोणाचेही नसल्याचे बोलले जात आहे. लोहरे एमडी बनविण्यातील महाराष्ट्रामधील महत्त्वाचा मास्टर असल्याचे समोर आले आहे. अनेकजण एकावेळी 5 ते 10 किलो एमडी बनवू शकतात. मात्र, लोहरे हा एकावेळी 50 किलो एमडी बनवू शकतो.

हेही वाचा









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *