file photo
नागपूर; महातंत्र वृत्तसेवा : नऊ महिने अतिशय कष्टाने आपल्या बाळाला पोटात ठेवणाऱ्या जन्मदात्या आईचा ती सतत आजारी असते तिची सेवा करावी लागते म्हणून कंटाळा आलेल्या एका मुलाने खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १) यशोधरा नगर पोलीस हद्दीत घडली. दुर्गा मेश्राम असे या मृत महिलेचे तर अंकित मेश्राम असे या आरोपीचे नाव आहे.
काही दिवसापूर्वी एका गतिमंद बहिणीची भावाने हत्या केल्याचा प्रकार हूडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत घडला. आज या घटनेने काळाच्या ओघात नाती कशी बदलत आहेत. माणूस माणसाचा कसा वैरी होत आहे त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. दूर्गा मेश्राम या वृद्ध महिलेला गेली टीबी, मधुमेह व इतर अनेक आजार असल्याने अनेक दिवस त्या अंथरुणावरच आहेत. विशेष म्हणजे हा मुलगा अंकितच त्यांची सेवाशुश्रूषा करत होता. मात्र, सततच्या या सेवेचाच त्याला कंटाळा आला की आणखी कुठल्या कारणाने त्याच्या डोक्यात सैतान संचारला की त्याने आज आज आपल्या आईची हत्या केली. राणी दुर्गावती चौक परिसरात राहणाऱ्या प्रिया शैलेश धनविजय नामक मुलीला याविषयीची माहिती शेजाऱ्यांकडून कळताच जावयासह ती घटनास्थळी पोहोचली. मृत आईच्या चेहऱ्यावरील जखमा बघून सारा प्रकार लक्षात आला.पोलिसांना माहिती देण्यात आली रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी चेहऱ्यावरील जखमांवरून हत्येचा गुन्हा नोंदविला. दारूच्या नशेत आईचे डोके दाबताना त्याने जोरदार डोके दाबल्यामुळे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.