बीडीओ संजय गोस्वामी दीर्घ सुटीवर गेल्याने फुलंब्री पंचायत समिती वाऱ्यावर‎: स्वाक्षरीअभावी रखडले रोहयोतील ६,२१० मजुरांचे पगार

फुलंब्री43 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

येथील पंचायत समितीतील रोजगार हमी योजना विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. रोजगार हमी योजनेचे वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, वैयक्तिक घरकुल, सार्वजनिक विहिरी, पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते आदी विविध कामांच्या संचिका धूळ खात पडून असल्याने महिनाभरापूर्वी आमदार हरिभाऊ बागडे यांनी तत्कालीन बीडीओ ज्योती कवडदेवी यांना धारेवर धरले होते. त्याचदरम्यान, कवडदेवी यांची तडकाफडकी बदली केल्यानंतर बीडीओ संजय गोस्वामी यांची नियुक्ती झाली, परंतु पदभार स्वीकारल्यापासून ते दीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांनी मजुरांच्या हजेरी पत्रकावर न केलेल्या स्वाक्षरीअभावी जवळपास ६२१० मजुरांचे पगार रखडलेले आहेत.

Related News

शासन आपल्यादारी हा उपक्रम आमदार हरिभाऊ बागडे यांनी राबवला होता.त्यावेळी संचिकाची मंजूर होत नाही असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. या वेळी बागडेंनी रात्री ११ वाजेपर्यंत पंचायत समितीत ठिय्या आंदोलन केले होते. याची दखल घेत ज्योती कवडदेवी यांचा पदभार काढून संजय गायकवाड यांना प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून नेमनूक केली होती.

गटविकास अधिकारी गोस्वामींची सावध भूमिका

ज्योती कवडदेवींचा पदभार काढून संजय गायकवाड यांची प्रभारी बीडीओ म्हणून नेमणूक केली होती. त्यांच्या कार्यकाळात संचिका नसताना कोट्यवधी रुपयांच्या वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या कामांना मंजुरी दिली गेल्याची चर्चा आहे. परंतु, गोस्वामी यांच्या कार्यकाळात ही कामे मंजूर झाली नाहीत, त्यामुळेच ते हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करत नसून दीर्घ रजेवर जाऊन सावध भूमिका घेत असल्याची चर्चा तालुक्यात आहे. या संदर्भात बीडीओ गोस्वामी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाइल बंद दाखवत आहे.

‘दिव्य मराठी’ने केला पाठपुरावा

फुलब्री पंचायत समिती अंतर्गत रोहयोंतर्गत कामात होत असलेल्या गलथान कारभाराबाबत ‘दिव्य मराठी’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत जि.प.चे सीईओ विकास मीना यांनी चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमलेली आहे.

सर्वाधिक मस्टर फुलंब्री तालुक्यात

प्रलंबित गंगापूर ८, पैठण ८२, फुलंब्री ६२१, वैजापूरमध्ये १ असे मस्टर प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वांत जास्त मस्टर (मजुरांचे पगारपत्रक) हे फुलंब्री तालुक्यात प्रलंबित आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *