ऐन ध्वजारोहणाच्या वेळी वीज खंडीत, मंत्री सावे संतापले; अधिकाऱ्यांची पळापळ

परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षाच्या (Marathwada Liberation Day) निमित्ताने विभागातील सर्व जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते आज शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. मात्र, तिकडे परभणी (Parbhani) शहरात महानगरपालिकेतील (Municipal Corporation) शासकीय ध्वजारोहणाच्या वेळीच विद्युत पुरवठा (Electricity) खंडीत झाल्याने एकच गोंधळ उडाला. या प्रकाराने मंत्री अतुल सावे (Atul Save) यांना यांचा पारा चढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना झापून काढले. अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आणि तब्बल अर्ध्या तासाने वीज पुरवठा सुरळीत झाला. शेवटी अर्ध्या तासाने सावे यांचे ध्वजारोहण झाले आणि अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण या निमित्ताने महावितरणाच्या भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. 

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने परभणी महानगरपालिकेकडून राजगोपालचारी उद्यानात 40 मीटर उंच तिरंगा झेंड्याचे उद्घाटन सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले होते. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे सावे सकाळी उद्यानात पोहचले. मात्र, ऐनवेळी गरबड झाली आणि झेंडा फडकवण्याच्या वेळीच विद्युत पुरवठा खंडित झाला. मग काय सर्व कार्यक्रमाची फजितीच झाली. या सर्व गोंधळामुळे सावेंचा पारा चढला आणि त्यांनी मनपा आयुक्तांना  झापले. अधिकाऱ्यांकडून फोनाफोनी सुरु झाली, मात्र वीज काही आली नाही. त्यामुळे मंत्री अतुल सावे यांच्यासह परभणीचे खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकारी यांना विजेची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. पुढे तब्बल अर्धा तासाने वीज आली आणि मंत्री महोदयांनी झेंड्याचे अनावरण केले. 

Related News

दरम्यान, आता यावरून आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. परभणी महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे हे सर्व झाल्याचा आरोप शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केला आहे. तसेच या झेंड्याचे काम अर्धवट असतानाच आज उद्घाटन केले गेल्याचाही आरोप पाटील यांनी केला आहे. 

मंत्री सावेंच्या हस्ते ध्वजारोहण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय ध्वजारोहण त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले. परभणी जिल्ह्यातील शासकीय ध्वजारोहण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. तर, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त परभणीच्या राज गोपाळ चारी उद्यान स्मृतीस्तंभास अभिवादन करून सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. “मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सर्व क्रांतिकारकांना मानाचा मुजरा, स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष जनसेवेच्या कार्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सावे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार; पाहा संपूर्ण यादी?

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *