एलन मस्क यांचे Gork जनरेटिव्ह AIच्या स्पर्धेत; चॅटजीपीटी, गुगल बार्डला देणार टक्कर | Musk Launches Gork | महातंत्र
महातंत्र ऑनलाईन डेस्क : चॅटजीपीटीने जनरेटिव्ह ए. आय. किती प्रभावी असू शकते हे जगाला दाखवून दिल्यानंतर तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये जनरेटिव्ह ए. आय.वर आधारित टूल बनवण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. गुगलने यात एक पाऊल टाकत ‘बार्ड’ सुरू केले. आता एक्सचे मालक एलन मस्क यांनी Gork हे जनरेटिव्ह एआय टूल लाँच केले आहे. सध्या काही निवडक युजर्सना गॉर्क उपलब्ध करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे एलन मस्क हे स्वतः चॅटजीपीटीच्या संस्थापकांपैकी एक आहेत. Gork हे एक्ससोबत (पूर्वीचे ट्विटर) असणार आहे. आणि हे रिअल टाईम अपडेट देऊ शकणार आहे. एलन मस्क म्हणतात, “Gork रिअल टाइम अपडेट देऊ शकणार आहे, इतर मॉडेल आणि Gorkमध्ये हा सर्वांत मोठा फरक आहे.”

आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे Gork विनोदबुद्धी आणि विरोधाभास यांचा वापर करून कल्पक उत्तरे देऊ शकतो. Gork हे एक्सच्या प्रिमियम आणि पेड सबस्क्रिप्शन घेतलेल्या युजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे.

हेही वाचाInformation Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *