England qualification scenario : वर्ल्ड कप तर गेला, चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा कसं असेल समीकरण

Champions Trophy qualification scenario : ना फलंदाज चालले ना गोलंदाज.. गोऱ्या साहेबांची भारतीय मैदानात फजिती झालीये. इंग्लंडच्या हातून आता वर्ल्ड कप (World Cup 2023) तर गेलाच आहे. मात्र, आता इंग्लंडसाठी चॅम्पियन ट्रॉफीसाठी (Champions Trophy) क्वालिफाय करणं अवघड झालंय. चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी वर्ल्ड कपचे पहिले सात संघ पात्र ठरतात. त्यामुळे आता इंग्लंड (England qualification scenario) पात्र ठरणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच इंग्लंडला क्वालिफाय करायचं असेल तर, त्यांच्याजवळ कोणते पर्याय आहेत, पाहुया…

अव्वल 7 संघामध्ये येण्यासाठी इंग्लंडला पुढील तिन्ही सामने जिंकावे लागतील. 6 सामन्यांतून 3 विजय मिळवणारा अफगाणिस्तान सध्या पाचव्या स्थानावर आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान आणि नेदरलँड यांना एकतरी सामन्यात पराभवाचा तोंड पहावं लागेल. जर इंग्लंड अव्वल सातमध्ये स्थान मिळवू शकला नाही तर ते आयसीसी स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतील. नेमकं इंग्लंडसाठी पात्रतेचं गणित कसं असेल?

तीन महत्त्वाचे समीकरण

इंग्लंडचे आगामी सामने ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि पाकिस्तानशी असणार आहे. या तीन सामन्यांपैकी तिन्ही सामने इंग्लंडला जिंकावे लागतील. जर यातील दोन सामने जिंकले तरी इंग्लंड पात्र ठरू शकतो. मात्र, त्यांचं भविष्य इतर संघाच्या हातात असेल.

Related News

इंग्लंडला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये जायचं असेल तर नेदरलँडला आगामी सर्व सामने हरावे लागतील. नेदरलँडचे आगामी सामने अफगाणिस्तान, इंग्लंड आणि भारत यांच्याविरुद्ध होणार आहेत. यातील सर्व सामने टफ होण्याची शक्यता आहे.

नेदरलँडबरोबरच बांगलादेशच्या कामगिरीवर देखील इंग्लंडचं लक्ष असेल. बांगलादेशचे आगामी तीन सामने पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध आहे. या 3 सामन्यापैकी 2 सामन्यात जर बांगलादेशचा पराभव झाला तर इंग्लंड चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा – सलग 4 पराभवानंतरही पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये जाणार; कसं ते जाणून घ्या!

तुम्हाला आठवत असेल तर इंग्लंडचा संघ हा डिफेन्डिंग चॅम्पियन आहे. मात्र, यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला चांगली कामगिरी करता आली नाही. सलामीजोडीचा ताळमेळ नसल्याने इंग्लंडची फलंदाजी खराब झाल्याचं दिसून आलं. तर बेन स्टोक्स आणि जॉस बटलर यांना देखील आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तर गोलंदाजीतील दिग्गज सपशेल फेल ठरलेत. त्यामुळे सध्या इंग्लंडच्या संघावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *