Explained : सूर्यकुमारच्या आधी जडेजाला बॅटिंगला का पाठवलं? पाहा काय होतं कॅप्टन रोहितचं लॉजिक?

IND vs AUS, Ravindra Jadeja : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन धक्कादायक निर्णय घेतले होते. गोलंदाजी करताना पहिल्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद सिराज यांनी स्पेलची सुरूवात करणं अपेक्षित होतं. मात्र, सामन्यात एन्ट्री मारली ती मोहम्मद शमीने… रोहितने पावरप्लेमध्ये बुमराह आणि शमी (Mohammed Shami) यांचे 5-5 ओव्हर पूर्ण करून घेतले. त्याचा टीम इंडियाला फायदा झाला होता. मात्र, रोहितचा एक निर्णय चुकल्याचं देखील पहायला मिळालं. तो निर्णय होता, जडेजा (Ravindra Jadeja) फलंदाजीसाठी वर पाठवणं… नेमकं काय झालं होतं? पाहा…

भारताच्या फलंदाजीवेळी विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानात येणं अपेक्षित होतं. मात्र, त्याच्या जागी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) मैदानात आला. जड्डूला पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. रोहितने सूर्याच्या आधी जडेजाला का पाठवलं? याचं कारण पाहुया…

विराट कोहली जेव्हा बाद झाला, तेव्हा टीम इंडियाचा स्कोर होता 81 धावा… टीम इंडियाचे 4 गडी तोपर्यंत तंबूत परतले होते. यामध्ये शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश होता. टीम इंडिया संकटात सापडली होती तर सामन्याच्या 40 ओव्हर बाकी होत्या. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना खेळपट्टीवर मदत मिळत होती. अॅडम झॅम्पा आणि मॅक्सवेल यांना लय सापडली होती. त्यामुळे मैदानात लेफ्ट आणि राईट हँड कॉम्बिनेशन गरजेचं होतं. टीम इंडियामध्ये फक्त रविंद्र जडेजा हाच एकमेवर लेफ्ट हँडल फलंदाजी करू शकणारा फलंदाज आहे. त्यामुळे रोहितच्या नजरा जडेजावर होत्या. 

Related News

सूर्यकुमार यादव तसा आक्रमक फलंदाज… सूर्याला लवकर पाठवलं असतं तर त्यासाठी सांभाळून खेळणं जड गेलं असलं. पुढील 30 ओव्हर मैदानात सांभाळून खेळणारा एकमेव फलंदाज बाकी होता, तो म्हणजे रविंद्र जडेजा. मैदानात केएल राहुल एक बाजू लावून उभा होता. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. जडेजा आणि सूर्या यांना चांगली कामगिरी करता आली नाही. जडेजाने 22 बॉलमध्ये 9 धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने 28 बॉलमध्ये 18 धावा केल्या. याचाच फटका टीम इंडियाला बसला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच टीम इंडिया ऑलआऊट झाल्याचं पहायला मिळालं.

आणखी वाचा – बीसीसीआयने केला कपिल देव यांचा अपमान, फायनलसाठी आमंत्रण नाही, म्हणतात ” माझ्या संपूर्ण 83 टीमला…”

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *