‘नितीन देसाईंकडे कर्जवसुलीसाठी…’ कर्ज देणाऱ्या एडेलवाईज कंपनीचं स्पष्टीकरण

Nitin Desai Sucide: प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या झाल्याने कला क्षेत्रात खळबळ उडाली. नितीन देसाई यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यातून ही आत्महत्या झाल्याचे समोर येत आहे. यावेळी नितीन देसाई यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या एडेलवाईज कंपनीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. कंपनीने नितीन देसाई यांच्याकडे वारंवार कर्ज वसुलीसाठी तगादा लावला असे वृत्त समोर येत आहे. दरम्यान एडेलवाईज कंपनीने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. 

नितीन देसाई यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी आणि कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे जी शब्दात मांडता येणार नाही. आम्ही त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि एनडी आर्ट्सच्या कर्मचार्‍यांसाठी मनापासून शोक व्यक्त करतो. असे  एडेलवाईज कंपनीने म्हटले आहे.

नितीन देसाई यांची आत्महत्या ही दुःखद घटना असून त्याची आवश्यक चौकशी व्हायला हवी. आम्ही त्यात पूर्ण सहकार्य करु, असे कंपनीने सांगितले आहे.  एडलवाईसने कायदेशीर कृती केल्याचा निष्कर्षही ते काढतील, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे. 

Related News

नितीन देसाई यांना थीम पार्क आणि खेळते भांडवल उभारण्यासाठी 2016 आणि 2018 मध्ये विस्तारित आर्थिक सहाय्य देण्यात आले. 2020 पासून कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि आर्थिक सुधारणा करण्यासाठी विविध प्रयत्न केले गेले. कंपनीची स्थिती फळाला आली नाही. कंपनीला अखेरीस 2022 मध्ये एनसीएलटीकडे पाठविण्यात आले. कंपनीने जुलै 2023 मध्ये NCLT मध्ये प्रवेश घेतला, असे एडलवाईसकडून सांगण्यात आले.  

दरम्यान एडलवाईस एआरसीने आरबीआयने अनिवार्य केलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले आहे. कंपनीकडून  कोणत्याही प्रकारे कायदेशीर चौकटीच्या बाहेर काम झालेले नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आमच्यासाठी मोठ्या खर्चात आणि वेळेवर कायदेशीर मार्गाने प्रक्रिया होणे गरजेचे होते. दरम्यान यामध्ये कुठेही व्याजदर जास्त आकारले जात नव्हते किंवा कर्जदारावर वसुलीसाठी अवाजवी दबाव टाकला जात नव्हता, असेही यावेळी सांगण्यात आले. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *