फडणवीसांचा प्लॅन बी ठरणार फेल? CM शिंदे अपात्र ठरले तर…जाणून घ्या कायदेतज्ज्ञांचे मत | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन डेस्क : शिंदे गटातील आमदार अपात्रतेचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदारकी रद्द झाली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्लॅन बी तयार ठेवला आहे. एकनाथ शिंदे यांची आमदारकी रद्द झाली तरीही तेच मुख्यमंत्री राहतील. आम्ही त्यांना विधानपरिषेदेचे सदस्य करु, असा प्लॅन बी देवेंद्र फडणवीसांनी सांगितला होता.

दरम्यान, फडणवीसांचा हा प्लॅन यशस्वी ठरणार का? याबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मत मांडले आहे. असीम सरोदे यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सरोदे लिहितात, “देवेंद्र फडणवीस हे वकिली शिक्षण घेतलेले व्यक्ती आहेत. अत्यंत निष्णात संविधानतज्ञ Shreehari Aney यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी वकील म्हणून काही काळ काम केले आहे व तरीही ते आज असंवैधनिक गोष्टी करण्यात ते नेहमी पुढाकार घेतांना दिसतात.

Devendra Fadnavis आता म्हणतात की, Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे ला अपात्र ठरवले तरीही त्यांना विधानपरिषदेत आमदार म्हणून घेऊ व तेच मुख्यमंत्री पदावर राहतील. त्यांनी मनात आणले तर ही पुढची घटनाबाह्यता ते आणू शकतात. हे सांगायला पाहिजे की संविधानाच्या कलम १०२/२ व १९१/२ मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की जर संविधानाच्या १० व्या अनुसूची नुसार जर एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर ते विधानसभेची निवडणूक लढवू शकत नाहीतच शिवाय ते विधानपरिषदेत सुद्धा सदस्य असू शकणार नाहीत. वकिलांनी आणि वकिली व्यवसायतील लोकांनी आपल्याला पाहिजे तसाच कायदा सांगावा, न्यायव्यस्थेतील लोकांनी यांना पाहिजे तसेच कायद्याचे अर्थ काढावे हा दबाव आणण्यात याच प्रवृत्तीने गढूळपणा आणला आहे.”

एकनाथ शिंदे

 

हेही वाचलंत का?









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *