लाडक्या बाप्पाला निरोप: गणेशोत्सवाची सांगता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा उत्सवमंडपातून मुख्य मंदिराकडे रवाना

एका मिनिटापूर्वी

  • कॉपी लिंक

गणेशउत्सवाची सांगता होत आहे. राज्यात त्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. मिरणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्यात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुंबईत तर 19 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या संदर्भात एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये 16,250 कॉन्स्टेबल, 2,866 अधिकारी, 45 सहाय्यक आयुक्त, 25 उपायुक्त, 8 अतिरिक्त आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी आहेत. याशिवाय एसआरपीएफच्या 35 प्लाटून, रॅपिड अॅक्शन फोर्सची एक कंपनी आणि होमगार्ड्स शहरात अनेक ठिकाणी तैनात राहणार आहेत.

मुंबई : मुंबईमधील गिरगावात विसर्जनाच्या दिवशी मोठी गर्दी असते. सकाळपासूनच नागरिकांनी येथे विसर्जन मिरवणुकीसाठी गर्दी केली आहे. गिरगाव चौपाटी भागातही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे.

पुणे : पुण्यात गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू झाली आहे. ढोल ताशाच्या गजरात गणरायची मिरवणूक काढण्यात येत आहे. कसबा गणपती मंडईकडे रवाना झाला आहे. तर इतर घरातील गणतींचे विसर्जनही सुरू झाले आहे. पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होत असतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा उत्सवमंडपातून मुख्य मंदिराकडे रवाना

छत्रपती संभाजीनगर : शहरात सुमारे 12 ते 15 मोठ्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. मुख्य मिरवणुकीशिवाय सिडको-हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, नवीन शहर, वाळूज, हर्सूल, सातारा, छावणी, जिन्सी येथूनही मिरवणुका निघणार आहेत. यंदा प्रथमच पाच अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांनी गस्त केली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार मिरवणुकीत डीजेच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे. रात्री 12 वाजेपर्यंत वाद्यांना परवानगी असली तरी मिरवणुकीतील डीजेच्या आवाजाची पातळी मोजली जाणार आहे. तसेच मशिदींजवळ विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. मनपाच्या अग्निशमन दलाने 8 ठिकाणी नियंत्रण कक्ष उभे केले आहेत.

नाशिक : गणपती विसर्जनासाठी महापालिकेसह पोलिस‎प्रशासन सज्ज झाले आहे. 21 चित्ररथ‎सहभागी असलेली बाप्पाची मिरवणूक‎वाकडीबारव येथून सकाळी 11 वाजताच सुरू‎ होणार आहे. दरम्यान, मिरवणूक मार्गावर 70 ‎सीसीटीव्हींसह 4 ड्राेनची करडी नजर‎असणार आहे. पर्यावरणपूरकतेचा विचार‎करुन पालिकेने 56 कृत्रिम तलावांची निर्मिती‎केली आहे. तर 27 नैसर्गिक तलावही सज्ज ‎ठेवले आहेत. यासह काही स्वयंसेवी ‎संस्थांनीही विसर्जन कुंड तयार केले आहेत.‎ शहर ‎पोलिस दलात पोलिस आयुक्तांच्या‎ मार्गदर्शनाखाली 4 उपायुक्त, 7 सहाय्यक‎आयुक्त, 59 निरीक्षक, 67 सहाय्यक‎निरीक्षक, 127 उपनिरीक्षकांसह 3,000 ‎अंमलदार व एक हजार होमगार्ड तैनात‎असतील. यासह दंगल नियंत्रण पथक, राज्य‎राखीव दल, जलद प्रतिसाद पथक, गुन्हे शोध‎ पथक तैनात करण्यात आले आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *