नाशिकच्या गंगापूर समूहातून जायकवाडीसाठी पाणी सोडणार, शेतकऱ्यांचा विरोध, पाणी संघर्ष पेटणार? 

नाशिक : नाशिक आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी (Jayakwadi Dam) सुमारे 8.7 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात नाशिकमधील ((Nashik) गंगापूर धरणातून 0.5  टीएमसी म्हणजेच पाचशे दश लक्ष घन फूट, तर दारणा धरण समूहातून 2 हजार 643 टीएमसी याप्रमाणे प्रमाणे पाणी सोडावे लागणार आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यात यंदा पाऊस (Nashik rain) कमी झाला असून चिंतानजनक परिस्थिति असताना जायकवाडीत पाणी सोडण्यात येत आहे. या पाणी सोडण्यासाठी नाशिककरांचा विरोध होत असल्याचे समोर आले आहे. 

गेल्या वर्षी राज्यात बहुतांश ठिकाणी अपुरा पाऊस झाला असून नाशिक जिल्ह्यात (Nashik District) तर सरासरीच्या 67.8 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातल्या त्यात धरणे भरली असली तरी तलाव आणि विहिरीतील पाणी साठा कमी झाल्यानंतर पिण्यासाठी देखील मागणी वाढणार आहे. याशिवाय पाऊस वेळेवर झाला नसल्याने खरिपाची पिके धोक्यात आली असून पुढील पावसाळ्यापर्यंत चारा आणि अन्य समस्या निर्माण होणार आहेत. अशातच जायकवाडी धरणात नाशिकहून पाणी सोडण्यात येणार आहे. गंगापूर धरण (Gangapur Dam) समूहातून आणि दारणा धरण समूहातून येत्या 31 ऑक्टोबर रोजी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यासाठी विरोध केला होता. आता पुन्हा विरोध होऊ लागला आहे. 

Related News

दरम्यान काही दिवसांपासून मराठवाड्यासाठी (Marathawada) पाणी सोडण्याच्या हालचाली झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गेल्या 17 आक्टोबरला छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक पार पडली. त्यात केवळ धरणांतील साठ्याची आकडेवारी सादर करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा असल्याने त्यावेळी आंदोलने टाळण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता, मात्र आता या संदर्भात आदेश जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण समूहातून 0.5 टीएमसी, दारणा समुहातून 2643 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी नाशिककरांचा विरोध असून यामुळे नाशिक नगर विरुद्ध मराठवाडा पाण्याचा संघर्ष होणार असल्याची चिन्हे आहेत. 

नाशिकहून पाणी सोडण्याला विरोध

नाशिक नगरच्या धरण समूहातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गंगापूर धरण समूह  0.5 टीएमसी, दारणा धरण समूह 2.643 टीएमसी, मुळा धरण समूह  2.10 टीएमसी, प्रवरा धरण समूह  3.36 टीएमसी असा एकूण एकूण नाशिक नगरमधून विसर्ग 8.603 टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.  मात्र दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील तालुके दुष्काळी सदृश्य असताना जायकवाडीला पाणी का सोडले जात आहे,या स सवाल नाशिकचे लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जायकवाडी धरणात 65 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यानं नाशिक नगर जिल्ह्यातून 8.603 TMC पाणी सोडले जाणार आहे. मात्र नाशिकहुन पाणी सोडण्याला विरोध होण्याची शक्यता असून पाणी सोडण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करण्यात येत आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Marathwada Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार, वरील धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *