दिव्य मराठी नेटवर्क | कँडी19 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
- पाकिस्तानविरुद्ध भारतीय स्टार ईशान किशन-हार्दिक पांड्याची अर्धशतके
- शाहीन आफ्रिदीने ४, तर नसीम व हॅरिस रौफचे प्रत्येकी तीन-तीन बळी
आशिया चषकातील सर्वात मोठ्या सामन्यात भारतीय आघाडीच्या फळीने निराशा केल्यानंतर भारताच्या पहिल्या डावानंतर पावसामुळे सामना रद्द करावा लागला. प्रथम खेळताना भारताचा डाव ४८.५ षटकांत २६६ धावांवर संपुष्टात आला. भारताचे दिग्गज फलंदाज रोहित, कोहली व शुभमन हे सामन्यावर कोणताही परिणाम न करता बाद झाले. मधल्या फळीत केएल राहुलच्या जागी खेळणाऱ्या ईशान व हार्दिकने भारतीय संघाची फलंदाजी कोसळण्यापासून वाचवली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मात्र, पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाविरुद्ध रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. शुभमन दुसऱ्या टोकाला संघर्ष करताना दिसला. पाचव्या षटकात पावसाने काही काळ सामना थांबवला. त्या वेळी भारताचा स्कोअर बिनबाद १५ होता. मात्र, पाऊस संपल्यानंतर त्याच षटकात शाहीन आफ्रिदीने कर्णधार रोहितला ११ धावांवर बाद केले. विराट कोहली आला. भारतीय चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र शाहीनने त्याला बाद केले. श्रेयस १४ धावांवर परतला. ईशान व हार्दिकने १३८ धावा जोडल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर भारताला २६६ धावांपर्यंतच मजल मारता आली. शाहीन (४), नसीम शाह (३) व हॅरिस (३) या त्रिकुटाने भारताचे सर्व बळी घेतले. आशिया चषक वनडेत वेगवान गोलंदाजांनी सर्व १० बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Related News
पाचव्या गड्यासाठी ईशान, हार्दिकची भारतासाठी सर्वात मोठी भागीदारी
जोडी धावा विरुद्ध वर्षे
ईशान-हार्दिक 138 पाकिस्तान 2023 द्रविड-युवराज 133 श्रीलंका 2004 धोनी-रोहित 112 पाकिस्तान 2008 धोनी-रोहित 79 श्रीलंका 2010
रोहित शर्मा गेल्या १८ डावांमध्ये डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध आठ वेळा झाला बाद
रोहित शर्माला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने विश्वचषकापासून वनडे सामन्यांच्या १८ डावांमध्ये एकूण ८ वेळा बाद केले आहे. गेल्या विश्वचषकापासून डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध विकेट गमावण्याच्या बाबतीत रोहित दुसऱ्या स्थानावर आहे, त्याच्या पुढे तमीम इक्बाल आहे. डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याची सरासरी केवळ २६.७५ आहे. मात्र, त्याला २१४ धावा करता आल्या. विराट कोहलीलाही डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध फारसे यश मिळालेले नाही. गेल्या चार वर्षांत १५ डावांमध्ये डावखुऱ्या गोलंदाजांनी त्याला ५ वेळा बाद केले. त्याची सरासरी ३१.४ आहे.
08 वा आशिया चषक खेळतोय रोहित. तो सर्वाधिक आशिया चषक खेळणारा भारतीय बनला. जडेजा ७ व कोहली सहाव्यांदा या स्पर्धेत खेळत आहेत.
05 भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध प्रथमच वनडे खेळला. शुभमन, ईशान, श्रेयस, सिराज, शार्दूल पाकविरुद्ध मैदानात उतरले होते.
>धावफलक भारताने नाणेफेक जिंकली (फलंदाजी)
भारत
धावा चेंडू 4/6 रोहित त्रि. गो. शाहीन 11 22 2/0 शुभमन त्रि. गो. हॅरिस रऊफ 10 32 1/0 कोहली त्रि. गो. शाहीन 4 7 1/0 श्रेयस झे. फखर गो. हॅरिस रऊफ 14 9 2/0 ईशान झे. बाबर गो. हॅरिस रऊफ 82 81 9/2 हार्दिक झे. आगा गो. शाहीन 87 90 7/1 जडेजा झे. रिजवान गो. शाहीन 14 22 1/0 शार्दूल झे. शादाब गो. नसीम 3 3 0/0 कुलदीप झे. रिजवान गो. नसीम 4 13 0/0 बुमराह झे. आगा गो. नसीम 16 14 3/0 सिराज नाबाद 1 1 0/0 अतिरिक्त : 20. एकूण: 48.5 षटकांत सर्वबाद 266. गडी बाद : 1-15, 2-27, 3-48, 4-66, 5-204, 6-239, 7-242, 8-242, 9-261, 10-266.
गोलंदाजी : शाहीन 10-2-35-4, नसीम 8.5-0-36-3, हॅरिस रऊफ 9-0-58-3, शादाब 9-0-57-0, नवाज 8-0-55-0, आगा सलमान 4-0-21-0.
बांगलादेशसाठी ‘करा किंवा मरा’चा सामना; अफगाणिस्तान पहिल्या सामन्यासाठी उतरणार
लाहोर | आशिया कप २०२३ चा चौथा सामना रविवारी बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. सह यजमान श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर बांगलादेशसाठी स्पर्धेत टिकून राहणे कठीण झाले आहे. बांगलादेशला स्पर्धेत कायम राहण्यासाठी आणि सुपर-४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी अफगाणिस्तानविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान रविवारी स्पर्धेतील पहिला सामना खेळेल. अफगाणिस्तानने आशिया कप सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेद्वारे तयारी सुरू केली होती. मात्र, त्या मालिकेत अफगाणिस्तान संघाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या खराब फलंदाजीने त्यांची निराशा केली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ केवळ १६४ धावा काढू शकला. संघाचा उपकर्णधार लिटन दास आजारपणामुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत पहिल्या सामन्यात खराब फलंदाजी केल्यानंतर बांगलादेशी संघ मोठे बदल करून मैदानात उतरू शकतो.
आशिया कपमध्ये बांगलादेशने अफगाणला फक्त एकदाच हरवले
: आशिया कपमध्ये अफगाणिस्तानचा बांगलादेशविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. अफगाणिस्तानने या स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध टी-२० आणि वनडेमध्ये ४ सामने खेळले आहेत. अफगाणिस्तानने ३ सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशने फक्त एकच सामना जिंकला. तसेच वनडे सामन्यांमध्ये बांगलादेशचा एकूण रेकॉर्ड चांगला आहे. बांगलादेशने एकूण १४ वनडेपैकी ८ सामने जिंकले. त्याचबरोबर अफगाणिस्तानने एकूण ६ वनडे जिंकले.