दगडाने ठेचून खून
गडचिरोली, महातंत्र वृत्तसेवा: ‘आमच्या घरात राहून फुकटचं खाते’, असे म्हणत नातवाने ७५ वर्षीय आजीचा काठीने प्रहार करुन खून केल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथे आज (दि.३) सकाळी घडली. ताराबाई पांडुरंग गव्हारे असे मृत वृद्धेचे, तर भाऊराव मनोहर कोठारे (वय २९) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी भाऊरावला अटक केली आहे.
मनोहर कोठारे हे आपल्या परिवारासह नवतळा येथे राहून शेती करतात. त्यांच्यासोबत त्यांची सासू ताराबाई गव्हारे हीसुद्धा वास्तव्य करते. आज सकाळी भाऊराव कोठारे याने वडील मनोहर कोठारे यांना ‘दारु पिऊन आले’ असे म्हणून वडील आणि आईला शिवीगाळ केली. त्यानंतर लगेच ‘आमच्या घरी राहून फुकटचं खाते’, असं म्हणून आजीवर काठीने जोरदार प्रहार केले. यात ती जागीच गतप्राण झाली. त्यानंतर आरोपी भाऊरावने मोटारसायकलने पळ काढत चामोर्शी शहर गाठले. तेथील हनुमाननगरात तो लपून होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी भाऊरावला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर भेंडारे घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा