‘उगाच रँकिंग आणि रेकॉर्ड वाढवून…,’ बाबर आझमवर संतापला गौतम गंभीर, म्हणाला ‘खरा खेळाडू…’

पाकिस्तानचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेने वर्ल्डकपमधील आपला विजयरथ कायम ठेवला आहे. शुक्रवारी दोन्ही संघ आमने-सामने आले असता रोमहर्षक सामना अनुभवण्यास मिळाला. पाकिस्तान संघ शेवटपर्यंत सामन्यात होता. पण अखेर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने या सामन्यात चांगली खेळी केली, पण तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. बाबर आझमची फलंदाजी पाहून भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर चांगलाच संतापला होता. समालोचन करताना त्याने बाबर आझमला खडे बोल सुनावले.

गौतम गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना म्हटलं की, “बाबर आझमने एकही परिणामकारक खेळी खेळलेली नाही. रेकॉर्ड्स आणि रँकिंग हे ओव्हररेटेड आहे. पण खरं सांगायचं तर 1 नंबर खेळाडू तोच असतो, जो आपल्या संघाला विजय मिळवून देतो. बाबर आझम अर्धशतक केल्यानंतरही तो एक मोठी खेळी करु शकला नाही”.

बाबर आझमने या सामन्यात 65 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. एक खराब फटका खेळण्याच्या नादात त्याने क्विंटन डी कॉककडे झेल सोपवला. मागील पाच सामन्यांबद्दल बोलायचं गेल्यास बाबर आझमने श्रीलंकेविरोधात 10, भारताविरोधात 50, ऑस्ट्रेलियाविरोधात 18, अफगानिस्तानविरोधात 74 आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात 50 धावा केल्या. या 5 पैकी फक्त एकाच सामन्यात पाकिस्तानला विजय मिळाला आहे. याव्यतिरिक्त सर्व संघांनी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. 

Related News

वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने केलेल्या पराभवासह हा पाकिस्तानचा सलग चौथा पराभव ठरला आहे. पाकिस्तान संघ आता जवळपास स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान संघ 6 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. 4 गुणांसह पाकिस्तान संघ सहाव्या क्रमांकावर आहे. तसंच त्याने नेट रन रेटही वजामध्ये आहे.

बाबर आझमची प्रतिक्रिया 

‘आम्ही विजयाच्या फार जवळ आलो होतो. पण शेवट आम्हाला हवा तसा झाला नाही. संपूर्ण संघ फारच निराश झाला आहे. आम्ही फार उत्तम पद्धतीने टक्कर दिली. फलंदाजी करताना आम्हाला 10 ते 15 धावा कमी पडल्या. वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांनी चांगली टक्कर दिली. मात्र दुर्देवाने आम्हाला विजय मिळाला नाही. हा सारा खेळाचा भाग आहे. डीआरएस हा खेळाचाच भाग असून त्याचा निकाल आणच्या बाजूने आला असता तर सामन्याचा निकाल फिरला असता,’ असं बाबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याबद्दल म्हणाला. तसेच पुढे बोलताना बाबरने, “हा सामना जिंकून सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्याचा आमचा प्रयत्न होता. पण असं झालं नाही. आम्ही आमच्या उरलेल्या पुढील तिन्ही सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करुन आणि पाकिस्तानासाठी चांगला खेळ करु. यानंतर आम्ही कुठे असून हे तेव्हाचं तेव्हा पाहात येईल,” असंही म्हटलं.

 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *