दिव्य मराठी विशेष: रक्षाबंधनाला देऊ या पत्र संस्कृतीचे रक्षण;अनाेखा उपक्रम‎, सुंदर राख्यांसह सुबक पत्र शिक्षण विभागाला पाठवा

  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Akola
  • Protection Of Letter Culture Given To Rakshabandhan; Send A Nice Letter With Beautiful Rakhi To Education Department, Many Activities

अकोला6 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पत्र संस्कृती हल्ली लोप पावत आहे. आपणं शेवटचे पत्र कधी आणि कुणाला लिहिले? याचं उत्तर अनेकांच्या आठवणीत नाही. तंत्रज्ञान प्रगतीमुळे वर्तमान पिढीला पत्र लिहिण्याची वेळ आली नाही. इंटरनेट, मोबाइल आणि व्हिडिओ कॉलच्या काळात वाढलेल्या पिढीला पत्र संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी अकोला माध्यमिक शिक्षण विभागाकडून अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना राखी पौणिमेला शिक्षणाधिकारी यांना एक सुंदर राखी आणि स्वत:च्या हातानी लिहिलेले पत्र पाठवायचे आहे.

Related News

रक्षा बंधनाच्या निमित्ताने पत्र संस्कृतीला पुन्हा रूजवण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे. पत्र लिहिणे ही सर्वसमान्य क्रिया नाही. तर यातून भावना, शब्द यांचे सुंदर रेखाटन होते. आपल्या भावनांचे आकलन करून लिखाण करताना कस लागतो. योग्य विचार करण्याचे संस्कार पेरले जातात. विचारांना दिशा मिळते. विचार योग्यपद्धतीने मांडण्याची सवय लागते. एखादी गोष्टीच्या लिखाणातून मनावर होणारे संस्कार अधिक दृढ असतात. तसेच पत्र लेखणातून सुस्पष्ट लिखाणाची सवय लागते.

पत्र म्हणजे फक्त शब्द, वाक्य नसतात. त्यामागे विचार, संस्कृती वहन आणि लिखाणाची मोठी परंपरा आहे. यामुळे ही कला जोपासणे अत्यावश्यक आहे. यामुळे शिक्षण विभागाकडून पत्र लेखनास प्रोत्साहन देण्याची संकल्पना पुढे आली. यातूनच राखीनिमित्त राख्यांसह पत्र लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या.या उपक्रमात विद्यार्थी एक सुंदर स्वत: तयार केलेली राखी आणि राखीविषयीच्या भावना पत्राद्वारे शिक्षण विभागाकडे पाठवणार आहे .या उपक्रमात सर्व शाळांनी मोठ्या संख्येत भाग घेण्याचे आवाहन माध्य. शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

येथे पाठवा

शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), शिक्षण विभाग जि. प. अकोला, जि. अकोला , महाराष्ट्र, पिन : ४४४००१

पर्यावरण संरक्षणाचा संदेश

रक्षाबंधन येते आहे. सर्व शाळांमध्ये राखी तयार करण्याच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सोबतच एक सुंदर राखी व राखीच्या शुभेच्छा व्यक्त करणारं स्वहस्ताक्षरातलं पत्र विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडे पाठवयाचे आहे. राखी बनवताना पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही, याची पण काळजी घ्यायची आहे. पत्र संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे.
डॉ. सुचिता पाटेकर, शिक ्षणाधिकारी माध्यमिक

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *