Gold Silver Price Today | ऐन सणासुदीत सोने- चांदी महागली, जाणून घ्या नवे दर | महातंत्र

महातंत्र ऑनलाईन : ऐन सणासुदीत सोने-चांदीचे दर वाढले आहेत. सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा दर ३०४ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ५९,३२० रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा दर २६२ रुपयांनी वाढून प्रति किलो ७२,११५ रुपयांवर गेला आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा दर ६० हजारांपर्यंत आणि चांदीचा दर ७३ हजारांवर जाण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Gold Silver Price Today)

संबंधित बातम्या 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज शुद्ध सोन्याचा म्हणजेच २४ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ५९,३२० रुपयांवर खुला झाला. तर २३ कॅरेट ५९,०८२ रुपये, २२ कॅरेट ५४,३३७ रुपये, १८ कॅरेट ४४,४९० रुपये, १४ कॅरेटचा दर ३४,७०२ रुपयांवर खुला झाला आहे. चांदीचा दर प्रति किलो ७२,११५ रुपयांवर खुला झाला आहे.

भारतातील सोन्या-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. जागतिक मागणीचीदेखील या मौल्यवान धातूंच्या दरामध्ये दिसून येणारा ट्रेंड ठरवण्यात महत्त्वाची भूमिका राहते. (Gold Silver Price Today)

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *