विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी: प्रथमच तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1, ताज्या क्रमवारीत पाकिस्तानला मागे टाकले

दिव्य मराठी नेटवर्क |मोहाली/दुबई40 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारताच्या कामगिरीमुळे आयसीसीने हे पोस्टर जारी केले.

क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडिया जगातील सर्वोत्तम संघ बनला आहे. शुक्रवारी ऑस्ट्रेलियावर मात करून भारतीय संघ आयसीसीच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. टीम इंडिया टी-२० आणि कसोटीत आधीपासूनच प्रथम स्थानी आहे. अशा प्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 बनला. भारतीय क्रिकेट संघाने इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची कामगिरी केली आहे.

Related News

भारतीय क्रिकेट संघ असा विक्रम करणारा जगातील दुसरा संघ बनला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने असे केले होते. ताज्या क्रमवारीत भारतीय संघाने पाकिस्तानला मागे टाकले आहे, तर ऑस्ट्रेलियानेही अद्यापपर्यंत अशी कामगिरी केलेली नाही.

एकूण – सामने – गुण – रेटिंग

टी-२०- ५९ – १५,५८९ – २६४

वनडे – ४२- ४,८६४- ११६

कसोटी – २९ – ३,४३४ – ११८

भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया संघावर पाच गडी राखून मात

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडेत भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव ५० षटकांत सर्वबाद २७६ धावांवर ढेपाळला. मो. शमीने ५ बळी घेत त्यांचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४८.४ षटकांत ५ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. भारताचे युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड व शुभमन गिलने अर्धशतके ठोकली. या जोडीने संघाला पहिल्या गड्यासाठी १२७ चेंडूंत १४२ धावांची भागीदारी करत मजबूत सुरुवात करून दिली. ऋतुराजने ७७ चेंडूंत १० चौकारांसह ७१ धावा केल्या. तर शुभमनने ६३ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ७४ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यर धावबाद झाला. कर्णधार लोकेश राहुलने नाबाद ५८ व सूर्यकुमार यादवने ५० धावा काढल्या. या खेळीद्वारे सूर्याने टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नर आणि स्मिथने दुसऱ्या गड्यासाठी १०६ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. वॉर्नर ९२ व स्मिथ ४१ धावा करून बाद झाला. त्यानंतर लॅबुशेन (३९), ग्रीन (३१), स्टोइनिस (२९) आणि इंग्लिस (४५) झुंज दिली. बुमराह, अश्विन, जडेजा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

प्रथमच एका महिन्यात तीन भारतीयांचे ५+ बळी

वनडे क्रिकेटमध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ३ भारतीय गोलंदाजांनी एका महिन्यात ५ किंवा त्याहून अधिक बळी घेतले. आशिया कपमध्ये कुलदीप यादवने पाकविरुद्ध तर सिराजने श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली. आता शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ गडी बाद केले.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *