खुशखबर: विश्वचषक आता टप्प्यात; इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय, टीम इंडिया उपांत्य फेरीत

मुंबई7 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारताने श्रीलंकेला ३०२ धावांनी नमवले. आता केवळ दोन सामने जिंकायचे आहेत- उपांत्य-अंतिम. तथापि, यापूर्वी २ साखळी सामने खेळायचे आहेत. त्यातील जय-पराजयाला महत्त्व नाही. कारण ७ विजय म्हणजे १४ गुणांसह भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. गुरुवारी भारताने प्रथम फलंदाजी करता ३५७ धावा केल्या. मात्र, श्रीलंका ५५ धावांवर सर्वबाद झाला. शमी-सिराजने एकूण ८ विकेट घेतल्या. भारताचा हा वर्ल्डकप इतिहासातील दुसरा मोठा विजय.

Related News

हे विक्रमही

  • श्रेयसने १०६ मी. लांब षटकार मारला. हा या वर्ल्डकपमधील सर्वात लांब.
  • विराट या वर्ल्डकपमध्ये ५ वेळा ५०+ पर्यंत पोहोचणारा एकमेव फलंदाज.
  • शुभमनचेही अर्धशतक. त्याने या वर्षी सर्वाधिक १२ अर्धशतके केली.
  • श्रीलंकेला दुसऱ्यांदा ६० धावांच्या आत गुंडाळले.
  • आशिया चषकात ५०, यंदा ५५. वर्ल्डकपमध्ये घरच्या मैदानावर भारताने २२ सामने जिंकले. हे सर्वाधिक.

शमीचा दरारा…
१८ धावांत श्रीलंकेचे ५ गडी बाद केले. या वर्ल्डकपच्या ३ सामन्यांत त्याच्या १४ विकेट. सर्वाधिक ४५ बळी घेणारा पहिला भारतीय. तेही केवळ १४ डावांत. जहीरचा (४४ बळी-२३ डाव) विक्रम मोडला.
शमीचे ५ बळी, वर्ल्ड कपमध्ये ४५ विकेट घेणारा एकमेव
हे प्रथमच…

  • एखाद्या संघाचे (श्रीलंका) सुरुवातीचे ४ फलंदाज केवळ एकच धाव करू शकले.
  • एखाद्या संघाच्या (भारत) दोन्ही ओपनर गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवर बळी घेतला.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *