Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची अजित पवारांवर जहरी टीका; अमोल मेटकरींकडून प्रत्युत्तर | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन डेस्क : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री  अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांना पत्र का लिहिले नाही? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना पडळकर यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले. शिवाय, त्यांनी पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान देखील केले आहे (Gopichand Padalkar)

गोपीचंद पडळकर म्हणाले, आम्ही अजित पवारांना मानत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र लिहिण्याचा विषय येत नाही. ते आम्ही नेहमी आमच्या विरोधात आहेत. ते आमच्या बरोबर आले तरी त्यांची भूमिका बदलेल असे वाटत नाही. अजित पवार यांची भूमिका आमच्याबाबत काय आहे? हे सांगण्याची गरज नाही. आम्ही आमच्या मागण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहचवल्या आहेत.  Gopichand Padalkar)

गोपीचंद पडकरांना आवर घाला; अमोल मेटकरींचे प्रत्युत्तर

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मेटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमोल मेटकरी म्हणाले, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, गोपीचंद पडळकर यांच्या विधानांना आवर घाला. पडळकर यांची ख्याती मंगळसूत्र चोर म्हणून आहे. ते कधी समाजाचेही होऊ शकलेले नाहीत. पडळकर यांना व्यसन घालण्याची क्षमता अजित पवार यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे. अजित पवार यांच्या विरोधात निडणुकीसाठी उभारल्यानंतर बारामतीकरांनी त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली आहे,  (Gopichand Padalkar)

हेही वाचलंत का?











Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *