जळगाव2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भाऊ आणि बहिणीचा पवित्र उत्सव म्हणजे रक्षाबंधन असून गेल्या 41 वर्षांपासून खंड न पडू देता आवर्जून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणीच्या हाताने चोपड्यात राखी बांधून घेतली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या दोन्ही बहिणी चोपड्यात राहत असून एक गणेश कॉलनी तर एक सुंदरगढी भागात वास्तव्याला असून ना गुलाबराव पाटील हे रक्षाबंधनाला आवर्जून उपस्थित राहुन बहिणीचा हाताने राखी बांधून घेत असतात.सूंदरगढी येथील निर्जलाबाई देशमुख व गणेश कॉलनी भागात सुशीलाबाई गुर्जर या दोन्ही बहिणीची त्यांनी भेट घेऊन आशिर्वाद घेतले आहेत.
यावेळी धरणगाव येथील सेनेचे उपजिल्हा प्रमुख मोतीलाल पाटील,गुर्जर समाजाचे नेते नवलसिंग पाटील,शिवसेना शहरप्रमुख आबा देशमुख,पालकमंत्री पाटील यांचे मेव्हणे नारायण देशमुख,माजी नगरसेवक महेश पवार,विजय देशमुख,भरत देशमुख,नाना देशमुख,रोहित देशमुख,आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की,विद्यार्थी दशेपासून मी या ठिकाणी येत असतो.बहीण आणि भावाचे हे दृढ नाते आहे. जेव्हा आई नसते तेव्हा बहीणी चा सर्वात जास्त आधार मिळतो आणि तो मला देखील मिळाला आहे.आज जे मला यश आणि फलश्रुती मिळाली आहे त्यात जसे जनतेचे आशीर्वाद मिळाले आहेत तश्याच प्रकारे मला बहिणीचा आशीर्वाद मिळाला आहे.
रक्षा बंधन हा पवित्र सण असून बहिणीच्या पाठीशी मी खंबीर पणे भाऊ म्हणून उभा आहे हे सांगण्यासाठी गेल्या 41 वर्षांपासून या ठिकाणी येतो.राज्यात अनेक भागात समाधान कारक पाऊस नसल्याने पाणी पुरवठा विभागाला कृती आराखडा तयार करण्याचे कामाचे आदेश दिले आहे. राज्यात शेती असो पिण्याची परिस्थिती ही भयावह असून येत्या कॅबिनेटमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो पण राज्यातील जनतेच्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पाऊस पडला पाहिजे.