प्रेमसंबंध ठेवले, नंतर लग्नास केली टाळाटाळ!: अखेर संतप्त झालेल्या प्रेयसीने केला थेट प्रियकरावर चाकू हल्ला; तरुणीवर गुन्हा दाखल

जळगावएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

प्रेमसंबंध ठेऊन लग्नास टाळाटाळ करणाऱ्या प्रियकरावर प्रेयसीने चाकू हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. निलेश बोरसे असे त्या प्रियकराचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चाकूहल्ला करणाऱ्या प्रेयसीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आधी प्रियकरावर गुन्हा दाखल केला
पाचोरा शहरातील तलाठी कॉलनी भागात रहिवासी असलेल्या निलेश बोरसे आणि एका तरुणीचे गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र, या दरम्यान दोघांच्यामध्ये सातत्याने भांडण होत असे. निलेश लग्न करण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यावर सदर तरुणीने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, निलेश तिला लग्नासाठी कसलाच प्रतिसाद देत नव्हता. अखेर संतप्त झालेल्या तरुणीने काही महिन्यांपूर्वी पाचोरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार करत गुन्हा दाखल केला होता.

घरी जाऊन धमकी, वाद होताच केला चाकूहल्ला
तक्रार केल्यानंतरही निलेशने लग्नासाठी प्रतिसाद दिला नसल्याने त्या तरुणीने शनिवारी रात्री निलेश बोरसे यांच्या घरी जात माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या परिवाराला सोडणार नाही अशी धमकी दिली. त्याचसोबत तिने निलेशवर चाकू हल्ला करत त्याला जखमी केले. या घटनेनंतर जखमी निलेश याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर प्रेयसीच्या विरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा सविस्तर
बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून दोन भावांनी केला खून : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती, प्रेमसंबंधाला होता विरोध

जिल्ह्यात पुन्हा एकदा सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, प्रेमसंबंधावरून दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने हत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात ही संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस ठाण्यात एकूण 4 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. चंद्रकला धोडिंबा बावस्कर (वय 35 वर्षे, रा. तोंडापूर, ता. जामनेर) असे मयत महिलेचं नाव असून, तर आरोपींमध्ये महिलेचा भाऊ कृष्णा धोडिंबा बावस्कर आणि शिवाजी धोडिंबा बावस्कर, वडील धोडिंबा सांडू बावस्कर आणि आई शेवंताबाई धोडिंबा बावस्कर समावेश आहे. – येथे वाचा संपूर्ण बातमी

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *