एका तासापूर्वी
- कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सध्या कुटुंबासह अमेरिकेत सुटी घालवत असून येथील एका कार्यक्रमातील रोहितचा एक व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहितची खास विनोदी शैली पुन्हा दिसून आली. रोहितने पत्रकारांच्या प्रश्नाला दिलेले उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी रोहितची पत्नी रितीकाही तिथे उपस्थित होती, तिलाही रोहितचे उत्तर ऐकून हसू अनावर झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहितचे उत्तर, उपस्थितांत हशा
पाकिस्तान संघातील सर्वात घातक गोलंदाज गोलंदाज कोण असा प्रश्न पत्रकाराने रोहितला विचारला. यानंतर रोहितने उत्तर दिले की, “सगळेच चांगले गोलंदाज आहेत यार… नाव घेतल्यावर मोठा वाद होतो. एकाचे नाव घेतले तर दुसऱ्याला वाईट वाटेल, त्यामुळे सगळेच खेळाडू चांगले आहेत.” रोहितने ज्या शैलीत उत्तर दिले, ते पाहून आणि ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी समोरच रोहितची पत्नी रितीकाही बसलेली होती. तीही रोहितच्या उत्तरावर हसत असल्याचे व्हिडिओत दिसते.
रोहितचा T20 मधून निवृत्तीचा विचार नाही:म्हणाला- अमेरिकेत सुटी घालवण्याचे खास कारण, इथे पुढचा T20 वर्ल्ड कप
भारताचा कर्णधार रोहित शर्माने कॅलिफोर्नियातील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की 2024 टी-20 विश्वचषक अमेरिकेत खेळला जाईल. त्यामुळे मी पुन्हा इथे येण्यास उत्सुक आहे. रोहित म्हणाला, एन्जॉय करण्याव्यतिरिक्त अमेरिकेत येण्याचे आणखी एक कारण आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, जून 2024 मध्ये T20 विश्वचषक होणार आहे. हे खूप रोमांचक असेल आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत.
2024 टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळवला जाईल. रोहित शर्मा 36 वर्षांचा झाला आहे. अशा परिस्थितीत पुढील वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची त्याची शक्यता कमी वाटत होती, परंतु त्यानेच आता निवृत्तीचा विचार नसल्याचे संकेत दिले आहेत. रोहितने 9 महिन्यांपासून एकही आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळलेला नाही. वाचा पूर्ण बातमी