हालसिद्धनाथ यात्रेची अमाप उत्साहात सांगता; भंडाऱ्याची अखंड उधळण, पाच दिवसांत लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन | महातंत्र

निपाणी; महातंत्र वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेची बुधवारी सायंकाळी 6 वा. मानकरी, पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेल्या पाच दिवसापासून सुरू असणाऱ्या या यात्रेत नाथांचे अनेक धार्मिक कार्यक्रम, ढोलवादन, वालंग, गजीनृत्य, बकरा खेळणे आदी कार्यक्रम झाले.

मंगळवारी पहाटे नाथांची पहिली व बुधवारी पहाटे दुसरी भाकणूककार भगवान डोणे (महाराज) यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी तर घुमट मंदिर येथे तिसरी अखेरची भाकणूक भगवान डोणे महाराज (वाघापुरकर) यांनी कथन केली.गेल्या पाच दिवसात या यात्रेसाठी लाखावर भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती. यात खडक मंदिरात मंगळवारी उजाडता बुधवारी पहाटे नाथांची 4.10 ते 5;40 या वेळेत दुसरी तर यानंतर घुमट मंदिर येथे सकाळी 9.30 ते 10.45 या वेळेत तिसरी भाकणूक झाली.

मंगळवारी दिवसभर महानैवद्याचा कार्यक्रम व बुधवारी सकाळी घुमटातील भाकणूक झाल्यानंतर सायंकाळी 6 वा. सुमारास भाकणूककार डोणे पिता-पुत्र यांच्या हस्ते कर तोडून या यात्रेची सांगता करण्यात आली.तत्पूर्वी वालंग कार्यक्रम झाला. सायंकाळी 5:30 वा. उत्सवस्थळी ढोल वादन व अखंड भंडाऱ्याची उधळण झाली. झाली. त्यानंतर नाथांच्या दोन्ही पालख्यांची व सबिना सोहळ्याची हालसिद्धनाथ व श्री. महालक्ष्मी मंदिर प्रदक्षिणा झाली.

त्यानंतर 6 वा. वाड्यातील मंदिरात नाथांची मूर्ती स्थानापन्न झाली. त्यानंतर कुर्ली येथील देवाची पालखी सोहळा मार्गस्थ झाला.गेल्या पाच दिवसापासून सुरू असणारी यात्रा पार पडली. यासाठी यात्रा कमिटी, पोलीस व ग्रा. प. प्रशासन,देवस्थान ट्रस्ट,पुजारी, मानकरी,ग्रामस्थ या सर्वांनी सहकार्य केले.

सलग चौथ्यावर्षी भाकणूक

काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या हालसिद्धनाथांच्या भाकणूकीला या यात्रेत मोठा मान आहे. दरवर्षी नाथ आपल्या भाकणुकीतून भक्तांना सावध करीत पुढील भविष्य कथन करतात. यंदा सलग चौथ्यावर्षी मंगळवारी व बुधवारी पहाटे पहिली व दुसरी भाकणूक भगवान डोणे महाराज यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे (वय 20) यांनी सलग चौथ्यावर्षी भाकणूक कथन केल्याने याची उत्सुकता भाविकात लागून होती.

दिल्लीच्या गादीवर पुन्हा कमळच, तिसरे महायुद्ध अटळ…

यात्रेची सांगता होण्यापूर्वी मंगळवारी रात्री बुधवारी उजाडता खडक मंदिर येथे दुसऱ्या भाकणूकीत सिद्धार्थ डोणे (महाराज) यांनी कलियुगात उलटा वारा येऊन लग्नकार्य पार पडतील.तर घुमट मंदिरात पार पडलेल्या तिसऱ्या भाकणूकित भगवान डोणे (महाराज) यांनी दिल्लीच्या गादीवर पुन्हा कमळ फुलून तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल.चीन देश भारतावर आक्रमण करेल,परंतु भारतीय सैनिक चिनी सैनिकांना पिटाळून,पळवुन लावतील.तिसरे महायुद्ध होऊन निष्पाप जनता मृत्युमुखी पडेल,अशी नवीन भाष्यवाणी केली.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *