भारत-पाकिस्तान मॅचमुळे गर्लफ्रेण्डला सोडलं! Breakup Chat मध्ये म्हणाला, ‘तुला गुलाम…’

Breakup For Momo And India vs Pakistan Match: पती-पत्नी असो किंवा प्रियकर-प्रेयसी असो जोडप्यांमध्ये होणारे वाद होणं ही सर्वसामान्य बाब आहे. नात्यांमध्ये मोकळेपणा मिळाला नाही तर अनेकदा एकमेकांना समजून घेणं कठीण होऊ बसतं. जोडीदार फार डिमांडिग असेल तर प्रेयसी आणि प्रियकराचं ब्रेकअप होतं. मात्र अनेकदा अशापद्धतीने नातं संपुष्टात आल्यानंतर एकजण रडूनरडून कोलमडून पडतो आणि समोरची व्यक्ती त्याच्या नजरेत व्हिलन ठरते. ब्रेकअपसंदर्भातील अनेक चांगल्या वाईट गोष्टी व्हायरल होत असतात. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे.

तू अकडू आहेस..

ट्वीटरवरील तनीशैतान नावाच्या हॅण्डलवरुन आपल्या मैत्रिणीच्या ब्रेकअपदरम्यान तिच्या ब्रॉफ्रेण्डने तिला शेवटची व्हॉइस नोट काय पाठवली होती याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामधील विधानं ऐकून तुम्हाला नक्कीच हसू येईल. या व्हिडीओमध्ये, ‘ऐकं रोशनी, एक तर आधीच तू अकडू आहेस. वरुन तू जेव्हापासून केस लाल केले आहेस तेव्हापासून तू अधिक अकडू झाली आहेस,’ असं बॉयफ्रेण्ड वेगळं होण्याआधी त्याच्या गर्लफ्रेण्डला सांगताना दिसत आहे.

वाईट मानून घेऊ नकोस…

‘तुझ्या एचएनएमच्या नादात मी भारत पाकिस्तान सामना चुकवला होता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुला रोज मोमोज खायचे असतात. 633 कॅलरी असतात एका प्लेटमध्ये. ते पचवण्यासाठी मला किती वेळा अॅब्स मारावे लागतात. खाऊन खाऊन अॅब्सचाही अब्बा झाला आहे. हे बघ वाईट मानून घेऊ नकोस पण तुला बॉयफ्रेण्ड नाही तर गुलाम हवा आहे. मला ही गुलामी करता येणार नाही. त्यामुळे टाटा गुडबॉय,’ असं म्हटलं आहे. 

Related News

कॉपी केलं

हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या बॉयफ्रेण्डने ही सर्व विधानं अॅमेझॉनवरील मिनी टीव्ही शो ‘हाफ लव्ह हाफ अरेंज्ड’मधून कॉपी केलं आहे. त्यानंतर तनीशैतानने पुढच्या पोस्टमध्येच हे सारं तिच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेण्डने कॉपी केलं आहे. 

अनेकांनी अॅमेझॉनच्या या मिनी टीव्हीवरुनही या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. या पोस्टवर संबंधित संवाद कोणत्या भागात आहे याची लिंक पोस्ट केली आहे. याचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअऱ करण्यात आला आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *