नाशिकचे व्यावसायिक हेमंत पारख यांची 10 तासांनंतर अपहरणकर्त्यांनी केली सुटका: संशयितांच्या मागावर परप्रांतात पोलिसांची पथके रवाना

नाशिक26 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

शहरातील बांधकाम साहित्य वितरक आणि गजरा उद्योग समुहाचे संचालक हेमंत पारख यांची रविवारी सकाळी दहा तासांनंतर अपहरणकर्त्यांनी सुटका केली. पारख यांच्या मित्रांनी पोलिसांच्या मदतीने अपहरणकर्त्यांशी संपर्क साधत मित्राची सुखरूप सुटका केल्याची चर्चा आहे. दरम्यान, पोलिस मागावर असल्याने अपहरणकर्त्यांनी पारख यांना गुजरातमधील बलसाड येथे महामार्गावर एका निर्जळस्थळी सोडले. मात्र त्यांच्या सुटकेमागील गूढ कायम आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके गुजरात, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पाठवली आहेत. इंदिरानगरमधील नभांगण लॉन्सजवळील निहित या आपल्या बंगल्यासमोरून पारख यांचे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अपहरण झाले.

Related News

जीपमधील चौघांनी शस्त्राचा धाक दाखवत अपहरण केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. घटनेनंतर सुरुवातीला विल्होळी जैन मंदिर, आंबेगाव, वाडीवऱ्हे, त्र्यंबकेश्वर, जव्हारपर्यंत लोकेशन मिळत होते. पारख यांची सुटका झाल्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उपआयुक्त प्रशंात बच्छाव यांनी तपासाची पुढील सूत्रे फिरवली. दरम्यान, पारख कुटुंबियांसोबत त्यांचे मित्र आनंद सोनवणे, बाॅबी काळे, माजी नगरसेवक सतीश सोनवणे, श्याम बडोदे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

हे प्रश्न अनुत्तरित

१) अपहरणामागे नेमके कारण काय?

२) सुटका अचानक कशी झाली?

३) अपहरणकर्त्यांनी काय मागणी केली व ती पूर्ण केल्यानंतरच सुटका झाली का?

४) पोलिसांनी अपहरणकर्त्यंाशी बोलणी केली की कुटुंबीयांनीच त्यांच्या पातळीवर हा प्रश्न सोडवला?

डोळ्यावर पट्टी, मारहाण.. प्रत्येक क्षण मृत्यू समोर…

पारख यांनी आपबिती सांगितली. ते म्हणाले, शनिवारी रात्री ९ च्या सुमारास बंगल्याबाहेर मोबाइलवर बोलत होतो. एक बुलेट पुढे येऊन थांबली. मागून एक जीपही आली व काही समजण्यापूर्वीच दोघांनी शस्त्राचा धाक दाखवत मला गाडीत बसवले. जिवे मारण्याची धमकी देत डोळ्याला पट्टी बांधली व मारहाण केली. मी सुटकेची विनवणी करत होतो. ते राजस्थानी व हरियान्वी भाषेत बोलत होते. ३०० ते ४०० किमी फिरवल्यानंतर सकाळी ६.३० वा. त्यांनी मला सोडले. तिथून दोन किमी पायी चालत पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांच्या मोबाइलवरून भाऊ राजीव व घरच्यांशी संपर्क साधला. मित्र व कुटुंबियांनी गाडी पाठवल्याने दुपारी ११.३० ला घरी पोहचलो. ते दहा तास प्रत्येक क्षण मृत्यू माझ्या समोर दिसत होता.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *