हिंगोली, महातंत्र वृत्तसेवा: जालना घटनेच्या निषेधार्थ डोंगरकडा, भाटेगाव, वरुड हिवरा, वडगाव, रेडगावसह परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. Hingoli Maratha Andolan
Hingoli Maratha Andolan : जागृत देवस्थान बाराशिव येथे कडकडीत बंद
जागृत देवस्थान बाराशिव येथे मंदिर परिसरातील दुकान बंद ठेवून निषेध व्यक्त केला. बाराशिव येथे हनुमान मंदिर असून सध्या श्रावण महिना सुरू असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते. परंतु मंदिर परिसरातील व्यापारी वर्गांकडून बंदला प्रतिसाद दिला.
औंढा नागनाथ येथील वकील संघाकडून निषेध
औंढा नागनाथ येथील वकील संघाच्या वतीने कोर्ट कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारावर प्रशासनामार्फत अन्याय केला जात आहे. त्यामुळे जालना घटनेची चौकशी करण्यासंदर्भात औंढा नागनाथच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. Hingoli Maratha Andolan
यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रदीप लोंढे सचिव ऍड अंकुश ढोबळे वकील संघाचे सन्माननीय सदस्य ॲड. बाळासाहेब कुठे ॲड.बालाजी सानप ॲड.मुंजाभाऊ मगर ॲड.विजय नागरे ॲड.सोपान ढोबळे ॲड.बी.जी. कल्याणकर ॲड.कासेफ काजी ॲड.मुस्ताक अहमद ॲड.स्वप्नील मुळे ॲड.शंकर देशपांडे ॲड.शेषराव कदम ॲड.रामजी कांबळे ॲड.किशोर कदम ॲड. विनोद मुखमहाले ॲड.चांजेश कदम ॲड.मंगेश सोळंके, ॲड.गणेश ठाकूर आदी उपस्थित होते.
Hingoli Maratha Andolan : औंढा तालुका राष्ट्रवादीचे तहसीलदारास निवेदन
जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना बडतर्फ करावे, औंढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या संदर्भाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने औंढा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीषा आखरे, बाबासाहेब गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संजय दराडे, रिपब्लिकन पक्षाचे किरन घोंगडे, माधव गारकर, प्रवीण टोम्पे, ज्ञानदेव गारकर, भानुदास गीते, तुकाराम वैद्य, नागोराव थोरात, पद्मावती थोरात, कुलदीप गायकवाड, रघुनाथ हांडे, बाळू पोले, शिवाजी क-हाळे, अॅड प्रकाश गायकवाड, आदित्य आहेर, राम देवकर, सुंदर देशमुख, प्रमोद मोरे, आदी उपस्थित होते.
गोरेगाव परिसरात बस बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना फटका
जालना जिल्ह्यातील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र दळणवळण व्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण भागातील एसटी बसेस बंद केल्याने गोरेगावसह परिसरात सर्वसामान्य जनतेला हाल सोसावे लागत आहे. विद्यार्थी, नागरिक यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचवण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
हेही वाचा