- Marathi News
- Sports
- Rinku Singh Interview; India Cricketer Ipl 2023 | Rinku Singh Ipl Career
कानपूर6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
IPL 2023 चा सर्वात रोमांचक सामना तुम्हाला आठवत असेल. कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंगने यश दयालला 5 चेंडूत 5 षटकार ठोकून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. आता रिंकू सिंगने दिव्य मराठीशी संवाद साधत त्या सामन्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
Related News
सलग 5 षटकार मारल्यानंतरही मी उत्साही नव्हतो, असे तो म्हणाला. एवढेच नाही तर मॅचनंतर मी यश दलालला मेसेज केला. खेळात हे सुरुच असते, असे सांगितले. दुसरीकडे, लग्नाच्या प्रश्नावर तो म्हणाला की, सध्या माझे संपूर्ण लक्ष खेळावर आहे. सध्या लग्नाचा विचारही नाही.
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग 30 ऑगस्टपासून ग्रीनपार्क स्टेडियमवर सुरू होणाऱ्या यूपी टी-20मध्ये पोहोचला आहे. तो मेरठ एव्हिएशन संघाकडून खेळणार आहे.
जाणून घेऊ, रिंकू सिंगची संपूर्ण मुलाखत…

मला फलंदाजीत आणखी सुधारणा करायची आहे, असे रिंकू सिंगने सांगितले.
प्रश्न : आयपीएलमध्ये 5 षटकार मारल्यानंतर कसे वाटले?
उत्तर : मी केकेआर संघाकडून खेळत होतो. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी लागोपाठ तीन बळी घेत आमच्यावर दडपण आणले होते. त्यामुळे जेव्हा मी मैदानात उतरलो तेव्हा संघाला जिंकण्यासाठी किती धावांची गरज होती हे मला माहिती नव्हते. माझ्यासमोर बॉलिंग करण्यासाठी उभा होता यश दयाल, तो युपी संघाकडून खेळतो.
मी त्याच्या चेंडूवर लागोपाठ तीन षटकार मारले, मग माझी नजर स्क्रीनवर गेली. बघितले तर जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज होती. त्यानंतर मी पुन्हा दोन षटकार मारून संघाला सामना जिंकून दिला. मला असे होईल अशी अपेक्षा नव्हती. यानंतरही फार उत्साह दाखवला नाही सामान्य खेळाडूसारखा राहिलो.

रिंकूने आयपीएलमध्ये अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे सांगितले.
प्रश्न : यशशी नंतर बोलला का?
उत्तरः यश दयाल आणि मी दोघेही युपीमध्ये एकत्र खेळतो. सामना संपल्यानंतर मी यशला मेसेज केला. म्हणालो, हा खेळ आहे. काळजी करण्याची गरज नाही. खेळात हे होतच असते. कोणत्याही खेळाडूने मनोबल कधीही गमावू नये. कधी चांगली तर कधी वाईट कामगिरी होत असते.
प्रश्न: आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांमधील फरक?
उत्तर : आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अधिक दबावाचा सामना करावा लागतो. क्षेत्ररक्षण असो की फलंदाजी, प्रत्येक वेळी वेगळेच दडपण असते. मला पहिल्यांदा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली तेव्हा मला वाटलेच नाही की, मी संघातील नवीन खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आल्यानंतर अनेक गोष्टी कळतात. त्यामुळे मला प्रथम फलंदाजी सुधारावी लागेल. याशिवाय खूप कष्ट करावे लागतात. प्रत्येक लीग आणि प्रत्येक फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करायची आहे. हे लक्षात घेऊन मी माझी तयारी करत आहे.
प्रश्न: भारतीय संघात पहिल्यांदा खेळून सामनावीर ठरणार, असा विचार केला होता का?
उत्तरः सामनावीर म्हणून माझी निवड होईल हे माहिती नव्हते. मी आयर्लंडविरुद्ध 21 चेंडूंत नाबाद 38 धावा केल्या. सामना संपल्यानंतर मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो. यानंतर बुमराह मला बाहेर घेऊन आला, त्यावेळी सर्व लोक बाहेर उभे होते. मला सामनावीर म्हणून निवडण्यात आल्याचे समजले. मला याची अजिबात अपेक्षा नव्हती.

मेरठ एव्हिएशन टीमचा टी-शर्ट लाँच करण्यात आला. यादरम्यान रिंकू सिंह म्हणाला- कुटुंबातील प्रत्येक सदस्याला माझ्याकडून भारतीय संघात खेळण्याची अपेक्षा होती.
प्रश्न : भारतीय संघातून खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पुढे काय करायचे?
उत्तरः भारताच्या संघात खेळणे हेच माझे दीर्घकाळ स्वप्न होते, कारण मी एका लहान कुटुंबातील आहे. माझ्यासाठी हे सर्वात मोठे यश होते. आता भविष्यात मला संघात सातत्याने चांगली कामगिरी करायची आहे, हे माझे स्वप्न आहे. यासाठी मी सरावही करत आहे. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण मजबूत करायचे आहे.

रिंकू सिंगने आयर्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर आई-वडिलांना भारताची जर्सी घालायला लावली.
प्रश्न: भारतीय संघात खेळला तेव्हा कुटुंबीय किती आनंदी होते?
उत्तरः आम्ही चार भाऊ आणि एक बहीण आहोत. मी एक दिवस भारतीय संघात खेळावे अशी घरातील प्रत्येकाची इच्छा होती. जेव्हा मी खेळायला गेलो तेव्हा माझ्या आई-वडिलांना किती आनंद झाला हे मी व्यक्त करू शकत नाही. जेव्हा मी परत आलो, तेव्हा मी पहिली गोष्ट माझ्या पालकांना माझी जर्सी दाखवली. हा क्षण माझ्यासाठी खूप अभिमानाचा होता.
प्रश्न : वरिष्ठ खेळाडूंसोबत अनुभव कसा होता?
उत्तरः मी भारतातून आयर्लंडला जात होतो तेव्हा प्रवास सुमारे 8 तासांचा होता. त्यादरम्यान वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा झाली. वरिष्ठ खेळाडूंकडून काही ना काही शिकायला मिळाले. ड्रेसिंग रूममध्ये असो किंवा प्रवासादरम्यान, प्रत्येकाने प्रेरणा देण्याचे काम केले, ते माझ्यासाठी खूप चांगले होते.

बंथरा मैदानावर सराव करताना रिंकू.
प्रश्नः युपी संघाची कामगिरी कशी असेल?
उत्तरः युपी संघाची कामगिरी खूप चांगली आहे. कारण आता खेळाडू खूप मेहनत घेत आहेत. चांगल्या खेळाडूंचा संघात समावेश होतो. नितीश राणाभाईंच्या आगमनाने संघ मजबूत झाला आहे. यावेळी युपीचा संघ चांगली कामगिरी करणार आहे.
प्रश्न: UP T-20 लीग खेळाडूंसाठी किती चांगली सिद्ध होईल?
उत्तर : ही लीग उत्तर प्रदेशच्या खेळाडूंसाठी खूप चांगली ठरणार आहे. या मंचावर युपीच्या प्रत्येक खेळाडूला चांगली कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये होणारे लाइव्ह टेलिकास्ट खेळाडूंसाठी सर्वोत्तम आहे, कारण आता आयपीएल फ्रँचायझीच्या सदस्यांनाही प्रत्येक लहान-मोठ्या खेळाडुंची कामगिरी पाहता येणार आहे. त्यामुळे आता आयपीएल सामन्यांमध्ये उत्तर प्रदेशातील खेळाडूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
प्रश्न: दोनाचे चार कधी होणार?
उत्तर : सध्या अशी कोणतीही कल्पना नाही. माझे लक्ष पूर्णपणे खेळाकडे आहे. त्यावर पुढे विचार करणार.