सन्मान: माजी राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुलशन राय यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार- 2023’ प्रदान

पुणेएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने माजी राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुलशन राय यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2023’ प्रदान करण्यात आला. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कार्याबद्दल एशियन कंट्रीज चेंबर ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे (आकोही) चेअरमन डॉ. सनी अवसरमल यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार 2023’, तर वैद्यकीय सामाजिक सेवेकरीता डॉ. सुधीर शहा यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2023’ देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते पद्मश्री मुरलीकांत पेटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूर्यदत्तच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी लाईफ कोच दिनेश नाथानी, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, कार्यकारी संचालक अक्षित कुशल आदी उपस्थित होते.

डॉ. गुलशन राय म्हणाले, आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. सगळे काही ऑनलाईन होत आहे. बँकिंगचे स्वरूप बदलले आहे. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने क्रांती घडवून आणली आहे. कोणतेही क्षेत्र निवडले, तरी तंत्रज्ञानाला पर्याय नाही. शिक्षण, वैद्यकीय, रोजगार क्षेत्रात मोठे बदल होत आहे. तंत्रज्ञानाभिमुख करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे विषय समजून घेत नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याला प्राधान्य द्यावे. या सगळ्या नव्या गोष्टींचा, तंत्रज्ञानाचा उपयोग करताना सायबर गुन्ह्यांना बळी पडणार नाही, याची दक्षता आपण सर्वानी घ्यायला हवी. त्यासाठी सायबर सुरक्षेचे नियम समजून घेऊन त्याचे आचरण करायला हवे.

सनी अवसरमल म्हणाले की, मुरलीकांत पेटकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरक आहे. अशी प्रेरक माणसे भेटली, की आपल्याला जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते. आज हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अतिशय उत्तम काम करत असून, तंत्रज्ञानाचा अंगीकार मोठ्या प्रमाणात केलेला आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *