– ज्यो. मंगेश महाडिक
मेष ः कामात तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वेळच्या वेळी आणि चपळाईने कृती केली तर इतरांच्या थोडे वर राहू शकाल.
वृषभ ः वरिष्ठांना गृहित धरू नका. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. दिवस उत्साहत जाईल व मन प्रसन्न राहील.
मिथुन ः तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. मनोबल उंचावेल आणि मनशांती लाभेल.
कर्क ः नातेसंबंधामध्ये समारेच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे.
सिंह ः गरज नसलेल्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा.
कन्या ः तुमचा जबरदस्त लवचिकपणा व निडरपणा मानसिक ताकद अधिक वाढविणारा ठरेल. आत्मविश्वास दुणावेल आणि कामाची ऊर्जा वाढेल.
तूळ ः आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक ः खूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. विनाकारण तणाव घेऊ नका.
धनु ः संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेतल्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आर्थिक फायदा होण्याची शक्यता.
मकर ः इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
कुंभ ः मौजमजेसाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. मित्रांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल.
मीन ः आरोग्याच्या द़ृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आत्मविश्वास मिळवून देईल.