मेष : श्री गणेश सांगतात आजची ग्रहदशा तुमच्यासाठी चांगली राहील. कोणतेही काम हाती घेताना त्यात चुका होणार नाहीत, यासाठी नियोजन चांगले करा. मुलांच्या करिअरबद्दल चांगली वार्ता मिळेल, त्यामुळे घरातील वातावरण चांगेल राहील. स्वतःच्या वर्तणुकीत लवचिकता ठेवा. विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये लक्ष द्यावे, सोशल मीडिया आणि इतर अनावश्यक गोष्टीत वेळ दवडू नये. प्रेमप्रकरणाला कुटुंबाची मान्यता मिळेल. चौरस आहार आणि व्यायाम यावर लक्ष द्या.
वृषभ : श्री गणेश सांगतात आज तुम्ही कोणत्याही संकटावर मात कराल. महिलांना आजचा दिवस चांगला जाईल. पण अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवल्याने अडचणीत याल. कुटुंब आणि करिअर यात समतोल ठेवताना तारांबळ उडेल. व्यवसायिक संपर्क मधुर राहतील याची काळजी घ्या.
मिथुन : श्री गणेश सांगतात तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे आजा सकारात्मक यश मिळेल, त्यामुळे स्वतःचा अभिमान वाटेल. पैसे अडकले असतील, तर ते मिळतील. अपमान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात तडजोड करू नये. नोकरीच्या ठिकाणी कामचा ताण जाणवेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. रक्तदाबाची समस्या असेल, तर काळजी घ्यावी.
कर्क :श्री गणेश सांगतात घरात आज शिस्तीचे वातावरण राहील. काम आणि वैयक्तिक गोष्टी या दोन्हीकडे लक्ष द्याल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात काही समस्या उद्भवतील. घरात तणाव राहील. पैशासंबंधित अंधळेपणाने कोणावर विश्वास ठेऊ नका. व्यावसायिक ठिकाणचे संबंध बळकट करण्याचा प्रयत्न करा.
सिंह : काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्येवर मात कराल. मित्र आणि गुरुवर्यांच्या संगतीत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. कारणाशिवाय कोणाशीही वाद घालू नका. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय आणि व्यापार यात परिस्थिती तुमच्या बाजूने राहील.
कन्या : श्री गणेश सांगतात घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी दयाळूपणे वागल्याने आणि त्यांचे मार्गदर्शन घेतल्याने नशिब साथ देईल. माध्यम आणि लोकसंपर्काशी संबंधित गोष्टींत लक्ष द्याल. इतरांवर अधिकचा विश्वास ठेवणे धोकादायक ठरेल. भविष्यातील नियोजन करताना स्वतःचा विचार करा. व्यवस्थापन कौशल्य आणि सहकऱ्यांशी असलेला संबंध यामुळे कामाचा झपाटा वाढेल. घरात बाहेरी व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण होईल.
तूळ : श्री गणेश सांगतात मनोरंजनात वेळ घालवाल. वडिलोपार्जित मालमत्तेशीसंबंधित अडचणीतून मार्ग निघेल. कलात्मक आणि कल्पक गोष्टींत रस घ्याल. दैनंदिन काम सुनियोजित ठेवा, अन्यथा महत्त्वाचे काम विसरून जाल. मुलांवर लक्ष ठेवा. घराच्या गोष्टीत बाहेरील व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नका.
वृश्चिक : श्री गणेश सांगतात आज ध्येयप्राप्तीत यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी केलेले बदल फायद्याचे ठरतील. विमा आणि इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. घरातील गोष्टीत अतिहस्तक्षेप करू नका. नियोजन करण्याच्या बरोबरीनेच काम सुरू करणेही आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना मदत मिळेल.
धनु :श्री गणेश सांगतात तुमचा आत्मविश्वास आणि नशिब यातून अधिकाधिक प्रगती कराल. एखाद्या प्रभावी व्यक्तीची भेट आर्थिकदृष्ट्या लाभकारक ठरेल. तुमचा स्वभाव भावनिक असल्याने लहान गोष्टींचाही त्रास होईल. उत्पन्न आणि खर्च दोन्हीही वाढतील. घाईगडबडीत केलेले काम बिघडू शकते. महत्त्वाच्या व्यक्तींना भेटाल, आणि त्यांचा सल्ला व्यवसायात महत्त्वाचा ठरेल. कुटुंबासमवेत खरेदी कराल त्यातून आनंद मिळेल.
मकर : श्री गणेश सांगतात तुम्ही आज दैनंदिन कामापेक्षा नव्या गोष्टींवर लक्ष द्याल. यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्याबद्दलचा आदरही वाढेल. मत्सरीवृत्तीतून काही लोक तुम्हाला मानसिकरीत्या कमकुवत बनवू पाहातील. घरासंबंधी काही निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज व्यवसायासाठी कर्ज घेऊ नका. लग्नासंबंधी चांगली बातमी कळेल.
कुंभ : श्री गणेश सांगतात तुम्ही आज कुटुंबासोबत खरेदीला वेळ द्याल. आध्यात्मिक गोष्टींशी जोडून घ्याल. वडिलोपार्जित मालमत्तेची विषय कोणाच्यातरी मध्यस्थीने सुटतील. मित्रांशी नातेसंबंध बिघडवू नका. तुमची काही गुपितं उघड होतील. धार्मिक ठिकाणी वेळ घालवाल त्यामुळे मानसिक शांतता मिळेल. कामाच्या ठिकाणी गडबड गोंधळ टाळून गांभीर्य ठेवा.
मीन :करिअरसंबंधित आनंदाची बातमी मिळाल्याने मुले आनंदात राहतील. जवळचे नातेवाईक घरी येतील. आज प्रवासाचा योग आहे. महत्त्वाची कामे करताना कुटुंबाचा सल्ला ठेवा. काही कारण नसताना मन अस्वस्थ राहील. त्यामुळे निसर्गात वेळ घालवा. अर्धशिशी आणि मनक्याचे त्रास होतील. दिवस धावपळीचा जाईल.