यजमान श्रीलंकेची विजयी सलामी: आशिया कप स्पर्धेत बांगलादेशवर 5 गड्यांनी मात; उद्या भारत-पाक सामना

  • Marathi News
  • Sports
  • Srilanka Beat Bangladesh By 5 Wickets In Asia Cup; Bowler Pathirana Man Of The Match

दिव्य मराठी नेटवर्क | पल्लेकल11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पाच वेळच्या किताब विजेत्या श्रीलंका संघाने घरच्या मैदानावर आशिया कप जिंकण्याच्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. शनाकाच्या नेतृत्वात श्रीलंका संघाने गुरुवारी सामन्यात शाकिबच्या बांगलादेश टीमचा ५ गड्यांनी पराभव केला. समरविक्रमा (५४) व असंलकाने (नाबाद ६२) संघाचा सलामीला विजय साजरा केला.

Related News

गोेलंदाज पथिराणा (४/३२) व थिक्षणाने(२/१९) प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा ४२.४ षटकांत १६४ धावांत खुर्दा उडवला. प्रत्युत्तरात श्रीलंका टीमने ५ गड्यांच्या मोबदल्यात सामना जिंकला.
यासह श्रीलंका टीमला मोहिमेची चांगली सुरुवात करता आली. सुमार फलंदाजीमुळे बांगलादेशला सलामीला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. आता बांगलादेश टीमला रविवारी अफगाणिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
उद्या भारत-पाकिस्तान संघांत रंगणार सामना

पल्लेकल| सहा वेळचा चॅम्पियन भारतीय संघ उद्या शनिवारपासून सातव्या किताबच्या आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा स्पर्धेतील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी आणि दोन वेळचा किताब विजेत्या पाकिस्तानशी होणार आहे. पल्लेकलच्या मैदानावर हे दोन्ही संघ शनिवारी समोरासमोर असणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसून सराव केला आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *