कोल्हापूर : कसबा तारळेत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक! | महातंत्र








गुडाळ; महातंत्र वृत्तसेवा : कसबा तारळे पैकी गायमाळ (ता. राधानगरी )येथील परसू देऊ कांबळे यांच्या घराला गुरुवारी (दि.२६) रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत त्यांचे राहते घर जळून खाक झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र आगीत प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले असून यामुळे सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

कसबा तारळे- पिरळ दरम्यान तुळशी प्रकल्पग्रस्तांची गायमाळ वसाहत आहे. ह्या वस्तीमध्ये मुख्य रस्त्याला लागूनच परसू कांबळे यांचे घर आहे. गुरुवारी रात्री जेवण करून घरातली सर्व मंडळी झोपी गेले असताना शेजारी राहणाऱ्या उत्तम लोकरे यांना घराच्या कौलामधून आगीचे लोट बाहेर पडताना दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परसु कांबळे कुंटूंबासह बाहेर आले. यावेळी जमलेल्या संजय पाटील, अतुल कांबळे, योगीराज कांबळे, अनिल सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, बाबू वंजारे, राजू पाटील यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले होते. ग्रामस्थांनी भोगावतीच्या अग्निशमन विभागाला वर्दी दिली.

त्यानंतर पाऊण तासातच भोगावती साखर कारखान्याचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला व आगेवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तलाठी डी.पी.नाईक, ग्रामविकास अधिकारी बी.एस.पाटील, पोलीस पाटील विक्रम सनगर, एकनाथ कांबळे यांच्या उपस्थितीत दुर्घटनेचा पंचनामा करण्यात आला.

हेही वाचा : 









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *