दुसऱ्या विवाहाचे फोटो पतीने स्टेटसला ठेवल्याने आत्महत्या: पतीने दुसरा विवाह केल्यामुळे डाॅक्टर पत्नीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर43 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

कोर्टात प्रकरण सुरू असताना पतीने चार दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले. लग्नाचे छायाचित्राचे स्टेटस ठेवल्याने तणावात असलेल्या पहिल्या डॉक्टर पत्नीने माहेरी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला.

Related News

फिजिओथेरपिस्ट डॉ. आयशा (वय २५) हिचे तीन वर्षांपूर्वी बुलडाणा येथील डॉ. जैद याच्याशी लग्न झाले होते. डाॅ. जैद हेही फिजिओथेरपिस्ट आहेत. दोघे हे पडेगाव परिसरात राहत होते. त्यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. घरगुती कारणावरून पतीसोबत वाद सुरू असल्याने आयशा ही माहेरी राहत होती. दोघांमधील वादाचे प्रकरण कोर्टात सुरू असताना डॉ. जैद याने चार दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीसोबतचे छायाचित्र त्याने स्टेटसवर लावले. हे पाहिल्यानंतर आयशा तणावात होती.

या तणावात आज तिने घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये ओढणीच्या साह्याने गळफास घेतला. घटना उघड होताच नातेवाइकांनी तिला उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. डॉ. जैद याने दुसरे लग्न केल्याने आयशा हिने आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. मृत डॉ. आयशा शेख हिचे वडील हे सेवानिवृत्त उपनिरीक्षक आहेत. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अाकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार बबन शिंदे करत आहेत.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *