ICC WC Tickets : आयसीसी वन-डे वर्ल्डकपचे तिकिट कसे बुक करावं? ही माहिती तुमच्यासाठी… | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन डेस्क : यंदाचा आयसीसी वन-डे वर्ल्डकप भारतामध्ये होणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. आयसीसीने वन-डे वर्ल्डकपचे सुधारित वेळापत्रक आज (दि.९) जाहीर केले. यामध्ये बीसीसीआयला सुरक्षेच्या कारणास्तव ९ सामन्यांच्या तारखांमध्ये बदल करावा लागला. (ICC WC 2023 Tickets)

यासोबत बीसीसीआयने वन-डे वर्ल्डकपच्या तिकीट विक्रीबद्दल ही माहिती दिली आहे. दि. १५ ऑगस्टपासून क्रिकेटप्रेमींना वर्ल्डकप सामन्यांची तिकीटे बुक करता येणार आहेत. (ICC WC 2023 Tickets)

तिकीट बुक करण्यापूर्वी चाहत्यांना https://www.cricketworldcup.com/register या वेबसाईटवर आपली नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणीदेखील दि. १५ ऑगस्टपासून आपल्याला करता येणार आहे. या वेबसाईटवर तिकीट विक्रीबाबतची सर्व माहिती  मिळणार आहे. यामुळे आपल्याला स्पर्धेमधील सामने पाहण्यासाठी आणि स्टेडियममधील आपली जागा आरक्षित करण्यासाठी मदत होणार आहे.

वर्ल्डकपची इ – तिकीटे क्रिकेटप्रेमींना मिळणार नाहीत. असे बीसीसीआयने आधीच घोषणा केले आहे. सामने पाहण्यासाठी चाहत्यांना स्टेडियममधील तिकीट विक्री सेंटरवर प्रत्यक्ष जाऊन तिकीट घ्यावी लागणार आहेत. बीसीसीआयने आधी तिकीट आरक्षित करणाऱ्या चाहत्यांना तिकीटाची हार्ड कॉपी पाठवण्याची जबाबदारी बुक माय शो आणि पेटीयम यांच्याकडे सोपवली आहे.

हेही वाचा;









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *