अजेय इंदुरात दुसरा वनडे: आज जिंकलो तर मालिका विजय आपलाच; सूर्या व चौथ्या क्रमांकाचा गुंता सुटला; अश्विन-श्रेयसला करावे लागेल सिद्ध

  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • If We Win Today, The Series Win Is Ours; Surya And The Fourth Number Of Entanglements Are Released; Ashwin Shreyas Will Have To Prove

दिव्य मराठी नेटवर्क |इंदूरएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक
  • या मैदानावरील सर्व सहा वनडे भारताने जिंकले

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने मोहालीतील पहिला वनडे सामना ५ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रविवारी संघ जिंकल्यास मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेईल. तसेच इंदूरच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर टीम इंडिया येथे वनडेत अजिंक्य ठरली आहे. येथे भारताने ६ वनडे खेळले आणि ते सर्व जिंकले आहेत. आता त्याला सलग सातवा वनडे जिंकण्याची संधी असेल. इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा भिडणार आहेत.

Related News

मालिकेपूर्वी सूर्यकुमार यादववर वनडेत स्वत:ला सिद्ध करण्याचे दडपण होते. या फॉरमॅटमध्ये तो सतत अपयशी ठरत होता. पण पहिल्या वनडेत सूर्याने ५० धावांची खेळी खेळून वनडेतील अर्धशतकाचा दुष्काळ संपवला. चौथ्या क्रमांकावर खेळताना कर्णधार राहुलने ५८ धावांची नाबाद खेळी केली. यामुळे टीम इंडियाच्या सूर्या व चौथ्या क्रमांकाचा गुंता सुटला. आता मोहालीच्या सपाट खेळपट्टीवर संधी हुकलेला श्रेयस अय्यर पुढील २ वनडेत धावा करू इच्छितो, जेणेकरून विश्वचषकापूर्वी मनोबल वाढेल. अक्षर पटेलच्या अनुपस्थिती आर. आश्विनला उर्वरित २ वनडेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. तसेच अश्विनने पहिल्या वनडेनंतर फलंदाजीचा सरावही केला.

फलंदाजी क्रमवारीत अव्वल १० मध्ये ३ भारतीय, गोलंदाजीत २

शुक्रवारी पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर आली आहे. यासह भारत तिन्ही फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत क्रमांक एकचा संघ बनला आहे. फलंदाजीत तीन भारतीयांचा सहभाग आहे. शुभमन दुसऱ्या, कोहली आठव्या, रोहित दहाव्या क्रमांकावर आहे. भारताशिवाय फक्त द. आफ्रिकेचे तीन फलंदाज अव्वल-१० मध्ये आहेत. गोलंदाजीत सिराज पहिल्या क्रमांकावर, तर कुलदीप नवव्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या सहाव्या स्थानावर आहे. टी-२० आणि कसोटीत अव्वल-१० मध्ये भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

खेळपट्टी आणि हवामान अहवाल

येथील खेळपट्टी बाउन्स व छोट्या सीमारेषेमुळे फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. या सामन्यात पाऊस पडण्याची भीती आहे. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहील, मात्र संध्याकाळी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

खेळून वनडेतील अर्धशतकाचा दुष्काळ संपवला. चौथ्या क्रमांकावर खेळताना कर्णधार राहुलने ५८ धावांची नाबाद खेळी केली. यामुळे टीम इंडियाच्या सूर्या व चौथ्या क्रमांकाचा गुंता सुटला. आता मोहालीच्या सपाट खेळपट्टीवर संधी हुकलेला श्रेयस अय्यर पुढील २ वनडेत धावा करू इच्छितो, जेणेकरून विश्वचषकापूर्वी मनोबल वाढेल. अक्षर पटेलच्या अनुपस्थिती आर. आश्विनला उर्वरित २ वनडेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. तसेच अश्विनने पहिल्या वनडेनंतर फलंदाजीचा सरावही केला.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *