Rohit Sharma : नवरा असावा तर रोहितसारखा…; गर्दीच्या अडकलेल्या रितीकासाठी गेला धावून

Rohit Sharma : टी-20 सिरीजमधून आराम दिल्याने सध्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सुट्ट्यांचा आनंद घेतोय.टेस्ट आणि वनडे सिरीज संपल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) ने वेस्ट इंडिज देशातून परतण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही खेळाडूंना वेस्ट इंडिज आणि आयर्लंड T20I साठी विश्रांती देण्यात आलीये. अशातच भारतात परतल्यावर रोहितने मुंबईतील अॅडिडास स्टोअरची भेट घेतली. यावेळी रोहितची पत्नी रितीका सजदेह ( Ritika Sajdeh ) देखील त्याच्यासोबत होती. यावेळी रोहित आणि रितीकाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. 

आदिदास स्टोरला भेट देऊन बाहेर पडल्यानंतर चाहत्यांनी रोहितच्या गाडीसमोर गर्दी केली होती. या गर्दीतून रोहित शर्माने कसं आपल्या बायकोला प्रोटेक्ट केलंय, त्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना मात्र हा व्हिडीओ फारच आवडला आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आदिदासच्या या इव्हेंटमधून बाहेर पडताना गर्दीतून गाडीपर्यंत पोहोचणं रितीका ( Ritika Sajdeh ) ला कठीण अनकन्फर्टेबल होत होतं. अशा परिस्थितीत रोहित शर्माने उत्तम पतीची चोख भूमिका निभावली. यावेळी त्या गर्दीतून रितीकाला मार्ग काढून योग्यरित्या प्रोटेक्ट करत गाडी बसवलं. 

Related News

रोहित आणि रितिका ( Ritika Sajdeh ) त्यांच्या निळ्या लॅम्बोर्गिनीमध्ये बसताना दिसतायत. यावेळी त्यांना आणि त्यांची कार पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी जमते. रोहितमुळे रितिका आरामात गाडीपर्यंत पोहोचते आणि मग दोघेही निघून जातात. 

नुकतंच रोहितचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला होता. एका कार्यक्रमादरम्यान रोहितला जेव्हा विचारण्यात आले की, तुला पाकिस्तानचा कोणता गोलंदाज सर्वाधिक आव्हानात्मक वाटतो? यावर रोहित शर्मा काहीवेळ शांत राहिला आणि नंतर आपल्या स्वभावाप्रमाणे त्यावर भन्नाट उत्तर दिलं.

रोहित शर्माने या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं की, “पाकिस्तानचे सर्वच गोलंदाज चांगले आहेत. मी कोणाचं नाव घेणार नाही. अन्य़था खूप मोठा वाद निर्माण होईल. मी कोणाचं नाव घेणार नाही, एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला वाईट वाटेल. त्यामुळे सर्वजण चांगले खेळाडू आहेत”. 

एकंदरीत रोहितने या प्रश्नाचं अगदी सेफ उत्तर दिलं. यावेळी रोहित शर्माने दिलेलं हे उत्तर ऐकून उपस्थित प्रेक्षक जोरजोरात हसू लागले. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेली त्याची पत्नी रितिकालाही हसू अनावर होत होतं. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *