CM पदाची शर्यत: मी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर ती पूर्ण होवो! नाना पटोले यांची महत्त्वकांक्षा उघड

छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

गत काही दिवसांपासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून खमंग राजकीय चर्चा झडत आहेत. भाजपने प्रारंभी हे पद शिवसेनेच्या शिंदे गटाला दिले. त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे शिंदे गटाच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची उचंबळून आली आहे.

Related News

नाना पटोले यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथील घृष्णेश्वर व खुलताबादच्या भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी खुलताबाद शहरातील जरी जरी बक्ष या दर्ग्यावरही चादर चढवली. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या श्रावण महिना सुरू आहे. हिंदू संस्कृतीमध्ये हा महिना धार्मिक समजला जातो. आम्ही इतर कुणासारखा दिखावा करत फिरत नाही.

मी ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षात धार्मिक भावना दुखाव्याचे कोणतेही काम होत नाही. त्यामुळे मी सर्वधर्मीयांचे प्रतीक असणाऱ्या ठिकाणी दर्शनासाठी जातो, असे ते म्हणाले.

यावेळी पत्रकारांनी नाना पटोले यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेविषयी छेडले. मी मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर ती पूर्ण होवो, असे ते म्हणाले. पटोले यांच्या या विधानामुळे त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

बाप हा बाप असतो…

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असणाऱ्या घडामोडींवर भाष्य करण्यास नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय सुरू आहे हे आम्ही पाहण्याचे कारण नाही. बाप हा बापच असतो. त्यामुळे एका मुलाने गडबड केली तरी फरक पडत नाही, असे ते यासंबंधी म्हणाले.

बधीर व नालायक सरकार

नाना पटोले यांनी यावेळी राज्यातील शिंदे – फडणवीस – पवार सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, हे बधीर व नालायक सरकार आहे. ते भय व भ्रष्टाचाराच्या बळावर चालते. अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, हे अध्यक्षांनाही ठावूक नाही. याद्वारे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. काँग्रेस हे सर्व मुद्दे जनतेच्या दरबारात मांडेल, असे ते म्हणाले.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *